• Download App
    कल्याण महापालिकेत शिवसैनिकांकडून राडा, कामकाज बंद करण्याचा प्रयत्न; पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये वादाची ठिणगी|Rada by Shiv Sainiks in Kalyan Municipal Corporation, attempt to stop work; Dispute erupts between police and Shiv Sainiks

    कल्याण महापालिकेत शिवसैनिकांकडून राडा, कामकाज बंद करण्याचा प्रयत्न; पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये वादाची ठिणगी

    विशेष प्रतिनिधी

    कल्याण : कल्याण महापालिकेत शिवसैनिकांनी राडा घालून कामकाज बंद करण्याचा प्रयत्न केला. या मुद्यावरून पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये वादाची ठिणगी पडली.Rada by Shiv Sainiks in Kalyan Municipal Corporation, attempt to stop work; Dispute erupts between police and Shiv Sainiks

    महाराष्ट्रात बंदच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आंदोलन करू सर्वत्र बंद पुकारला. मात्र नागरिकाच्या कामासाठी महापालिका उघडी असल्याने शिवसेनेच्या कामगार सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेत शिरुन कामकाज बंद करायचे आवाहन केले.



    पालिका कर्मचाऱ्यांना ते बंद करण्याची ताकीद दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धावले. त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रोखले. मात्र महापालिकेमध्ये शिवसेनेचे अधिकृत युनियन असल्याने पोलिस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.

    त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्या कार्यालयात जाऊन बसले. सध्या महापालिका परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त असून युनियनमध्ये सहभागी असलेल्या काही कामगारांनी आंदोलनामध्ये सामील होत काम बंद केले.

    Rada by Shiv Sainiks in Kalyan Municipal Corporation, attempt to stop work; Dispute erupts between police and Shiv Sainiks

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    न्यायालयाच्या निर्णयानंतरही मनाेज जरांगेंचा अडेलतट्टूपणा कायम, आझाद मैदानातून उठणार नसल्याची भूमिका

    मराठा आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी; मुंबई पोलिसांनी जारी केली ट्रॅफिक ॲडव्हायझरी!!

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन; ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीवर लगावला टोला