विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूरातील आर.सी. गँगला पोलिसांनी मोक्का लावला आहे. कोल्हापूरसह संपूर्ण जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, गर्दी, हाणामारी, हत्यारे बाळगून दहशत माजवणे असे गंभीर गुन्हे या गँगवर दाखल आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी या गँगवरील मोक्काच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या टोळीच्या दहशतीमुळे शहरातील नागरिक, व्यापारी, व्यावसायिक प्रचंड हतबल झाले होते.
R.C. gang in Kolhapur arrested by police
या टोळीवर गंभीर स्वरूपाचे ३७ आणि अदखलपात्र ८ गुन्हे दाखल आहेत. आर.सी. गँगचा म्होरक्या रवी सुरेश शिंदे, प्रदीप रामचंद्र कदम, संदीप मोतीराम गायकवाड, जावेन इब्राहिम सय्यद, सागर सुरेश जाधव, प्रकाश कुबेर कांबळे, अक्षय ऊर्फ आकाश अशोक कदम, अजय सुनील माने, योगेश मानसिंग पाटील, विकी माटुंगे (सर्व रा. जवाहरनगर) यांच्यावर कारवाई झाली आहे.
आंबा घाट जड वाहनांसाठी पुन्हा होणार खुला
मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ उठवण्याच्या प्रयत्नात या गँगणे शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत खंडणी उकळणे, सुपारी किंग, भूखंड माफिया म्हणून आर.सी. गँगने वर्चस्व निर्माण केले होते. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी मोक्काचा प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे पाठवला होता.
दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी मोक्काच्या प्रस्तावातील त्रुटी दूर करून हा प्रस्ताव मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठवला आणि त्यांनी शुक्रवारी रात्री प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
R.C. gang in Kolhapur arrested by police
महत्त्वाच्या बातम्या
- पुढील वर्षीपर्यंत पाच अब्ज कोरोना लसींचे उत्पादन, संपूर्ण जगाला पुरविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला विश्वास
- कॉंग्रेसचे प्रत्येक राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचार, गरीबांची जाणीवच नाही, अमित शहा यांचा हल्लाबोल
- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याकडूनच कल्याण काळे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडीकडे तक्रार, शेअर्सच्या नावाखाली शेतकºयांकडून गोळा केले ३५ कोटी रुपये
- काश्मीर विषय पेटविण्याचा जेएनयूमधील डाव हाणून पाडला, वकिलाच्या तक्रारीनंतर परिसंवाद रद्द