विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेल्या दीड महिन्यापासून हे सुरू आहे. पण हतबलता म्हणून मी शांत बसले. लोकप्रतिनिधी आपल्यावर चिखलफेक करतात तेव्हा बोलणं गरजेचं आहे. राजकारणात महिला कलाकरांना का खेचता असा सवाल प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केला आहे. Prajakta Mali
आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी तसेच यू ट्यूब चॅनलवरून सुरू असलेली बदनामी थांबावी या मागणीसाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्राजक्ता बोलत होती. यावेळी प्राजक्ताच्या आईच्या डोळ्यात पाणी आले. प्राजक्तानेही हात जोडून बदनामी करू नये अशी विनंती केली. Prajakta Mali
बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचा उल्लेख केला. “सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल, त्यांनी परळीला यावे. त्यांचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा प्रसार करावा”, असं सुरेश धस म्हणाले होते. यावर सूनवताना प्राजक्ता म्हणाली, बीडमध्ये पुरुष कलाकार गेले नाहीत का? तुम्हा महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाहीत तर कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. यातून तुमची मानसिकता दिसते, म्हणत प्राजक्तानं सुरेश धस यांना सुनावलं आहे. त्यांनी माझीच नाही तर इतर अभिनेत्रींचंही नाव घेतलं आहे त्यांचीही माफी मागावी.
प्राजक्ता म्हणाली, आपण का जमलोय हा विषय तुम्हाला माहीत आहे. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना जी टिप्पणी केली त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी आले आहे. काल नाही, दीड महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. दीड महिने मी शांतपणे सामोरे जात आहे. ट्रोलिंगला, निगेटिव्ह कमेंटला. शांतता ही माझी मूक संमती नाही. माझ्यासारख्या अनेक महिला आहेत, कलाकार यांची ही हतबलता आहे. हे शांत राहणं तुमच्यामुळे आमच्यावर बेतलं आहे. एक व्यक्ती रागाच्या, उद्वेगाच्या भरात काही तरी बरळून जाते. त्या दोन वाक्याचा मीडिया हजारो व्हिडीओ करून जातो. तेवढेच शब्द पकडतो
. त्यावरून युट्यूब चॅनलवर हजार व्हिडीओ बनतात. त्यावर सेलिब्रिटिला बोलणं भाग पाडलं जातं.मग ती व्यक्ती बोलते. मग दुसऱ्या व्यक्तीला वाटतं आपण बोललंच पाहिजे. मग ती बोलते. पुन्हा दुसरी व्यक्ती बोलते. आता नाही बोलली. का गप्प बसली. मग बोलणं क्रमप्राप्त होते. ही चिखल फेक सुरू राहते. महिलांची अब्रू निघत राहते. यांचं मनोरंजन होतं. हे होऊ नये. सर्व समाज माध्यमांसमोर चिखलफेक होऊ नये म्हणून मी यात पडले नाही. या गटारात दगड टाकणं योग्य वाटलं नाही” असं प्राजक्ता माळी यांनी सांगितलं.
या आवया जशा उठताता तशा निघून जातात, घरच्यांचा, सहकाऱ्यांचा माझ्यावर एवढा दांडगा विश्वास होता की मला माझ्या चारित्र्याचा खुलासा करण्यासाठी पुढे यावं याची कधी गरज वाटली नाही. मात्र आज ही वेळ आलीये. ही अत्यंत नामुष्की आहे. कारण लोकप्रतिनिधी त्यावर प्रतिक्रिया देतात. अफवांना स्थान नाही. पण वावटळीवर लोकप्रतिनीधी बोलतात. ज्यांना आपण निवडून दिलं. ज्यांनी विधीमंडळात बोलावं, आपल्या हक्कांचं रक्षण करावं, आपल्यासाठी न्याय मागावा, अशी आपली ज्यांच्याकडून अपेक्षा आहे, अशी मंडळी जेव्हा चिखलफेक करतात तेव्हा ही वेळ येते.
प्राजक्ता म्हणाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांच्याकडे माझी मागणी आहे की जर अशा प्रकारे कोणाची बदनामी होत असेल तर त्या यू ट्यूब चॅनलवर कारवाई करावी.
Question to Suresh Dhas of Prajakta Mali
महत्वाच्या बातम्या
- Abdul Rehman Makki : मुंबई 26/11 हल्ल्याचा कट रचणारा अब्दुल रहमान मक्की याचे निधन
- Manmohan Singh मनमोहन सिंग यांचा अपमान करणाऱ्या नवाज शरीफ यांना मोदींनी दाखविली होती ‘औकात’
- Manmohan Singh : शिष्याचा सन्मान करायची “पश्चातबुद्धी” गुरूचा अपमान कसा भरून काढेल??
- Indian Economy : पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.5% दराने वाढणार; दुसऱ्या तिमाहीत विकास दर 21 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर