भाजप महायुतीच्या सरकारची गेल्या तीन महिन्यांमधली राजकीय वाटचाल पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पकडलेली दिशा भाजप शतप्रतिशत कडे निघाल्याचे सांगितले जात आहे. पण आधीची काँग्रेस आणि काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारे आणि शत प्रतिशत भाजपचे सरकार या दरम्यानच्या वाटचालीत गुणात्मक फरक दिसण्याची गरज आहे. fadnavis government
गेल्या तीन महिन्यांमध्ये राजकीय बातम्यांच्या आढावा घेऊन त्याच्या विश्लेषणाद्वारे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, प्रभाकर सूर्यवंशी यांनी देवेंद्र फडणवीस यांची वाटचाल मोदी + शाह यांच्या भाजपने ठरविल्यानुसार शत प्रतिशत राजवटीकडे चालली आहे. त्यामध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये एकनाथ शिंदे यांची नाराजी आणि धनंजय मुंडे + वाल्मीक कराड यांचे प्रकरण या गोष्टी जरी आडव्या गेल्या असल्या, तरी अखेरीस देवेंद्र फडणवीस यांनीच या सगळ्यावर मात करत सरकारची वाटचाल शतप्रतिशत भाजपकडेच चालविल्याचा निष्कर्ष काढला आहे. पण या सगळ्यात आधीची राज्य सरकारे आणि भाजप महायुतीचे राज्य सरकार यांच्यातला गुणात्मक फरक हळूहळू विरत केल्याचे दाहक वास्तव मात्र भाऊ किंवा सूर्यवंशी यांनी सांगितले नाही.
वास्तविक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीचे सरकार आल्यानंतर ज्या वेगाने आणि ज्या एकजनसीपणे सरकारची वाटचाल व्हायला हवी होती, तशी निदान सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये तरी दिसली नाही. उलट पहिल्या तीन महिन्यांमध्ये political foul व्हावेत तशी एकनाथ शिंदेंची राजकीय नाराजी बाहेर आली आणि त्याही पलीकडे जाऊन धनंजय मुंडे + वाल्मीक कराड यांच्यासारख्या “पवार संस्कारित” गुन्हेगारी प्रवृत्तीशी फडणवीसांना सामना करावा लागला.
वास्तविक अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपने सत्तेच्या वळचणीला आणून बसवली नसती, तर फडणवीसांना सरकारमध्येच धनंजय मुंडे यांना ठेवून त्यांचे “राजकीय ओझे” बाळगावे लागले नसते. उलट पवारांच्या संस्कारांनी निर्माण केलेली धनंजय मुंडे यांच्या सारखी प्रवृत्ती वेळीच ठेचता आली असती. जी भाजपच्या एकूण धोरणांसाठी अधिक सोयीची ठरली असती. पण मोदी + शाह यांच्या भाजपच्या केंद्रीय राजकारणाच्या सोयीसाठी “पवार संस्कारितांना” सत्तेच्या वळचणीला आणून बसवावे लागले आणि त्यातूनच फडणवीसांना गेल्या तीन महिन्यांमध्ये राजकीय गोची सहन करावी लागली.
फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना दम भरून अखेरीस राजीनामा घेऊन मंत्रिमंडळावरचे आपले वर्चस्व सिद्ध केले, पण त्याचे विश्लेषण करताना भाऊ किंवा सूर्यवंशी यांनी जे वास्तव मांडले, ते कुठेतरी शरद पवारांसारख्या राजकीय प्रवृत्तीचे भलामण करणारे ठरले. पवार आणि फडणवीस मिळून महाराष्ट्राचे राजकारण खेळवत आहेत किंवा फडणवीसांनी एका दगडात किती पक्षी मारले, अशी जरी मखलाशी यातून केली असली, तरी प्रत्यक्षात ज्या शरद पवारांच्या सगळ्या राजकारणाला महाराष्ट्राच्या मतदारांनी अक्षरशः उलथून फेकले आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या अखेरीस त्यांना फक्त १० आमदारांचे नेते ठरवून टाकले, त्या पवारांची राजकीय पत्रास बाळगण्याचे खरं म्हणजे 132 आमदारांच्या भाजपला किंवा त्या नेतृत्वाला काहीच कारण नव्हते. पवारांचा व्यक्तिगत करिष्मा किंवा त्यांचे राजकारण केवळ आमदार संख्येवर किंवा खासदार संख्येवर अवलंबून नाही अशी भलामण पवारांच्या अपयशानंतर त्यांचे भाट पत्रकार करतच होते, त्याला फडणवीस किंवा भाजपच्या नेतृत्वाने खतपाणी घालायचे काही कारण नव्हते. त्या उलट आम्ही पवारांना पूर्णपणे वगळून किंवा पवार नावाच्या nigliable factor ला महाराष्ट्राच्या राजकारणातून पूर्णपणे उखडून आमची स्वतंत्र वाटचाल करतो आहोत, हे दाखविण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम होता. कारण महाराष्ट्राच्या जनतेने तसा ठसठशीत कौल भाजप महायुतीला दिला होता.
एरवी पवारांच्या चलतीच्या अथवा उतरतीच्या काळात काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना ज्या “मर्यादेत” ठेवले, थोडक्यात ज्या लायकीत ठेवले, त्याच “मर्यादेत” भाजपच्या वरच्या आणि खालच्या नेतृत्वाने त्यांना ठेवायला हवे होते, ते केवळ व्यक्तिगत सौजन्यापोटी किंवा संबंधांपोटी ठेवले नाही म्हणून पवार आणि फडणवीस एकत्रितपणे महाराष्ट्राचे राजकारण खेळवत आहेत, असे चित्र निर्माण झाले. जे खरंच वास्तवाला धरून होते का??, याविषयी दाट शंका आहे.
– गुणात्मक फरक दिसलाच पाहिजे
पण त्या पलीकडे जाऊन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खरंच भाजपची शतप्रतिशत कडे वाटचाल सुरू असेल, तर त्यातून राजवटीतला गुणात्मक फरक निश्चित दिसला पाहिजे. जुन्या काँग्रेसच्या किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या सरकार सारखेच भाजप महायुतीचे सरकार चालू आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर जसे आरोप होत होते, तसेच आरोप भाजप महायुतीतल्या मंत्र्यांवर होत आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकाच सरकारमध्ये राहून जसे एकमेकांवर कुरघोडी करायचे, तशीच भाजप महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांची राजकीय कुरघोडी सुरू आहे, असे चित्र जर निर्माण होत असेल, तर जुन्या काँग्रेस राजवटीच्या किंवा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या राजवटीच्या अवकळा भाजप महायुतीच्या फडणवीस सरकारला आल्याशिवाय राहणार नाही आणि हे भाजप महायुतीच्या बाबतीत बिलकुल अपेक्षित नाही. किंबहुना हा दोन सरकारांमधला गुणात्मक फरकही नाही, जो खरं म्हणजे दिसणे अपेक्षित आहे.
– अजितदादांची “दादागिरी” बंदच केली पाहिजे
महायुतीचे सरकार चालविताना फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद सांभाळून एकनाथ शिंदे यांना सहकार्य केले होते, तसेच सहकार्य एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना करणे अपेक्षित आहे आणि ते बिनबोभाट होणे अपेक्षित आहे. तसे होत नसेल तर भाजपच्या वरच्या आणि खालच्या नेतृत्वाने शिंदे यांना आपल्या पद्धतीने “सरळ” करण्याची गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये ज्या पद्धतीने अजित पवारांची “दादागिरी” चालायची तसली “दादागिरी” भाजपच्या फडणवीस सरकारने बिलकुल सहन करता कामा नये. त्यासाठी अजितदादांना वेळ देण्याची देखील गरज नाही, इतकी total grip फडणवीसांची सरकारवर बसणे अपेक्षित आहे, तरच जुन्या काँग्रेस सरकार किंवा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार आणि भाजप महायुती सरकार यांच्यातला गुणात्मक फरक ठळकपणे लोकांच्या नजरेसमोर येईल. अन्यथा भाजपला 132 आमदार देऊन देखील सरकारमध्ये गुणात्मक फरक पडणार नसेल आणि तो दिसणार नसेल, तर काही उपयोग होणार नाही. हे पवारांपुढे पाण्याचा ग्लास सरकवणाऱ्या आणि त्यांची खुर्ची पुढे मागे सरकवणाऱ्या भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाला समजले पाहिजे. महाराष्ट्राचे राजकारण त्यांच्या व्यक्तिगत सौजन्याच्या पलीकडे जाऊन भाजपने खेळलेच पाहिजे, त्याला तरणोपाय नाही!!
Quality difference must be shown between the old Congress – NCP government and BJP mahayuti fadnavis government
महत्वाच्या बातम्या
- Virat Kohli विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये मोडले ५ मोठे विक्रम
- मुख्यमंत्री फडणवीस + उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मुंबई महापालिकेच्या ₹ 2 लाख कोटींच्या प्रकल्पांचा आढावा!!
- Jharkhand : झारखंडमध्ये नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
- धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी देवेंद्र फडणवीसांची भूमिका कठोर; पण…