प्रतिनिधी
मुंबई : मुंबै बँक कथित घोटाळाप्रकरणी ठाकरे – पवार सरकारचा मुंबई पोलिसांवर प्रचंड दबाव आहे आणि त्यात दबावातूनच माझी उलट सुलट चौकशी करण्यात आली. मला अनेक नियमबाह्य प्रश्न विचारण्यात आले, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.Putting tremendous pressure on the police, my interrogation, outrageous questions; Praveen Darekar’s allegations against Thackeray-Pawar government
प्रवीण दरेकर यांची काही तास मुंबई पोलिसांनी चौकशी केली. चौकशी संपवून बाहेर आल्यानंतर प्रवीण दरेकर पत्रकारांशी बोलत होते. मुंबै बँकेचा मी संचालक असताना काय लाभ घेतले हे आणि असलेच प्रश्न मला उलट-सुलट पद्धतीने विचारले गेले. माझी चौकशी सुरू असताना पोलिस निरीक्षकांना सात वेळा फोन आल्याने ते फोन घ्यायला अँटी चेंबरमध्ये जात होते. यावरूनच त्यांच्यावर सरकारचा किती दबाव होता हे लक्षात येते, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.
पोलिसांनी अनेक नियमबाह्य प्रश्न विचारले. मुंबई बँकेत संदर्भातच माझ्या विरोधात तक्रार झाली होती. त्या बँके संदर्भात प्रश्न विचारण्यापेक्षा अन्य संस्था आणि अन्य बाबींवर देखील पोलिसांनी प्रश्न विचारले तरी देखील आपण त्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याचे दरेकरांनी सांगितले. आपण पूर्वी मजूर असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. त्याचे पुरावे देखील पोलिसांना दिले आहेत.
परंतु मूळातच ही चौकशी ठाकरे पवार सरकारच्या संपूर्ण दबावापोटी झाली पण माझी नियत साफ असल्यामुळे मला कोणतीही दर नाही असे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले. प्रवीण दरेकर यांचा मोबाईल जप्त केल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांनी दिली होती. परंतु, प्रत्यक्षात ही बातमी प्रवीण दरेकर यांनी फेटाळून लावली. चार्जिंग संपल्यामुळे फोन बंद पडला होता, असे ते म्हणाले
आम आदमी पार्टीची तक्रार
आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मुंबै बॅंक बोगस मजूर प्रकरणात दरेकरांवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी, मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली असून, त्यांना सोमवारी सकाळी 11 वाजता माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
आता याच प्रकरणात दरेकर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर झाले. पण या प्रकरणात दरेकरांना पोलीस अटक करू शकले नाहीत. कारण सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर, दरेकरांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावेळी कोर्टाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यास बंदी केली आहे.
प्रवीण दरेकर हे पोलिसांना चौकशीत सहकार्य करत आहेत त्यांनी विचारलेली प्रश्नावली मोठी आहे. त्या प्रश्नांना ते उत्तर येत आहेत. पण पोलिसांनी आणि राज्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांचा संयम पाहू नये, असा इशारा भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी दिला आहे.
प्रवीण दरेकरांवर आरोप
मजूर नसतानाही गेली 20 वर्षे मजूर असल्याचे खोटे भासवून प्रवीण दरेकर मुंबई बँकेवर संचालक/ अध्यक्ष म्हणून निवडून येत आहे. या 20 वर्षात मुंबै बँकेत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले असून त्याबाबत सहकार विभागाने वेळोवेळी सहकार कायदा 1960 च्या कलम 89 अ अंतर्गत चौकशी करून अहवाल दिलेले आहेत. 2015 पासून ‘नाबार्ड’च्या प्रत्येक अहवालात मुंबै बँकेतील अनियमितता आणि घोटाळ्यांवर ठपका ठेवलेला आहे.
2013 साली सहकार विभागाने 89 अ अंतर्गत केलेल्या चौकशीत संचालक मंडळाने मुंबै बँकेची व ठेवीदारांची फसवणूक केल्याचे, विश्वासघात केल्याचे स्पष्टपणे नमूद करत कारवाईची शिफारस केली होती. मात्र 2013 च्या या अहवालावर सहकार विभागाने आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही.
Putting tremendous pressure on the police, my interrogation, outrageous questions; Praveen Darekar’s allegations against Thackeray-Pawar government
महत्त्वाच्या बातम्या
- Gorakhpur Temple Attack : गोरखपूर मंदिर हल्ल्यात दहशतवादी कारस्थान; हल्लेखोर मुर्तजा अब्बसी मुंबई आयआयटीचा पदवीधर!!
- Nawab Malik ED : नवाब मलिकांचा ईडी न्यायालयीन कोठडीचा मुक्काम १४ दिवसांनी वाढला!!
- PM Modi Meeting : मोफत योजनांमुळे राज्ये जातील आर्थिक खाईत; पंतप्रधान मोदींच्या बैठकीत वरिष्ठ सचिवांचा इशारा!!
- भैरवी सोशल फाऊंडेशनच्या ‘जागर 2022’ मध्ये विविध क्षेत्रातील गुणवंत्त महिलांचा सन्मान