विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठी रंगभूमीवरील प्रत्येकाची कारकीर्द सुरू करणारी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा, ही प्रत्येक नाट्यकरणीच्या आयुष्यातली अतिशय महत्त्वाची आणि जवळची स्पर्धा आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक नाटक करणारा कलाकार हा कधी न कधी पुरुषोत्तम करंडक या स्पर्धेत सहभागी झालेला असतो. सध्या सिनेमा नाटक सिरीयल या तिन्ही क्षेत्रात आपलं अमूल्य असे योगदान देणारे कलाकार हे पुरुषोत्तम करंडक या स्पर्धेतून समोर आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ही स्पर्धा प्रचंड लोकप्रिय आणि मानाची समजली जाते. या स्पर्धेत एन्ट्री व्हावी आपला परफॉर्मन्स चांगला व्हावा आणि आपल्या एकांकिकेला बक्षीस मिळावं यासाठी प्रत्येक कॉलेजच्या विद्यार्थी जिवाच रान करत असतो. यावर्षीच्या महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित 58व्या आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या निकालाची नुकतीचं घोषणा करण्यात आली असून,अंतिम फेरीसाठी 9 संघांची निवड करण्यात आली आहे. Purushotam karandak spardha
अंतिम स्पर्धेत पोहोचलेले संघ : महाविद्यालयाचे नाव आणि कंसात एकांकिकेचे नाव या क्रमाने :
अप्पासाहेब जेधे महाविद्यालय (पाईक), झील अभियांत्रिकी महाविद्यालय (परत फिरारे), आयएमसीसी महाविद्यायल, (मायबाब..!?), मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय (रवायत ए विरासत), मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड (फेल सेफ), स. प. महाविद्यालय (कृष्णपक्ष), विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, बारामती (पाऊस पाड्या), राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडे (पंक्चर पोहे), टिळक आयुर्वेद महाविद्यालय (पिक्सल्स).
अभिनय उत्तेजनार्थ दहा : (कलाकाराचे नाव, कंसात भूमिका, एकांकिकांचे नाव आणि महाविद्यालय) सानिका आपटे (रमा, त्रिजा, फर्ग्युसन महाविद्यालय, स्वायत्त), पूर्वा हारुगडे (संगिता, आरं संसार संसार, आयएलएस विधी महाविद्यालय), शंतनू गायकवाड (दश्श्यू, राखणदार, मॉडर्न कला, शास्त्र, वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर), गार्गी माईणकर (साथीदार/आजी, स्त्रीसुक्त – अर्थात काळ्या बाळीची कथा, म. ए. सो. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्), तृप्ती जाधव (लक्ष्मी, पिंपळपान, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती), मैत्रेयी वडगे (राधा, मांदिआळी, श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय), अंतरा वाडेकर (प्रिया, तोरण, पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर), समृद्धी शेट्टी (ती, फोबिया, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी), विवेक पगारे (मधुकर देशपांडे, अमृतफळे, पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), स्वरा कळस (मिनी, एजंट वन, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे).
उत्तेजनार्थ विद्यार्थी दिग्दर्शक : श्रेयस जोशी (सिनेमा, मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय).
उत्तेजनार्थ विद्यार्थिनी दिग्दर्शक : आर्या देवरे (पूर्णविराम, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय).
स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. 16 ते 30 ऑगस्ट या कालावधीत झाली. एकूण 51 संघांनी या स्पर्धेत सादरीकरण केल
प्राथमिक फेरीच्या स्पर्धेचे परिक्षण प्राथमिक फेरीचे परिक्षक गिरीश केमकर, मिलिंद कुलकर्णी, शेखर नाईक यांनी केले.
या स्पर्धेची अंतिम फेरी 9 ते 10 सप्टेंबर रोजी भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे.
Purushotam karandak spardha
महत्वाच्या बातम्या
- ‘Smile Please..’, प्रज्ञान रोव्हरने चंद्रावरचा लँडर ‘विक्रम’चा काढलेला फोटो, इस्रोने केला जारी
- वक्फ बोर्डाकडून १२३ मालमत्ता परत घेणार, केंद्र सरकारने दिली नोटीस; दिल्लीच्या जामा मशिदीचाही यादीत समावेश!
- ‘अरविंद केजरीवाल पंतप्रधानपदाचे उमेदवार असावेत’, ‘INDIA’ आघाडीच्या बैठकीपूर्वी ‘आप’च्या प्रवक्त्यांचं मोठं विधान!
- पूर्वांचलातून आलेल्या बहिणींसाठी राखी पौर्णिमेचं खास सेलिब्रेशन ! पुण्यातील गणेश मंडळांनी साजरी केली एक आगळी वेगळी राखी पौर्णिमा!