विशेष प्रतिनिधी
पुणे :गेली अनेक वर्ष स्वतःच्या अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना 35 व्या पुण्यभुषण पुरस्काराने बालगंधर्व रंग मंदिरात सन्मानित करण्यात आले.त्रिदल पुणे, पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकरांच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातॊ. Punya Bhushan Puraskar mohan aaghashe.
जेष्ठ अभिनेत्री पद्मभूषण शर्मिला टागोर आणि पद्मभूषण अनुपम खेर यांच्या हस्ते मोहन आगाशे यांना प्रदान करण्यात आला.सोन्याच्या नांगराने भूमी नांगरणारे बाल शिवाजी यांचं शिल्प असणारं पुण्यभूषण सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, शाल आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.शहराने दोषासकट सांभाळून घेतले त्या पुण्यात आज हा सन्मान होत आहे, याचा आनंद आहे.
माझ्या आयुष्याच्या संध्याकाळी आलेला हा पुण्यभूषण पुरस्कार आहे. मी केलेले काम एकट्याने केलेले नाही. ज्या ज्या क्षेत्रात काम केले ते अनेकांनी मिळून केले आहे, त्यामुळे हा माझा एकट्याचा पुरस्कार नाही, तर माझ्या या प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचा हा पुरस्कार आहे.
यावेळी बोलताना शर्मिला टागोर म्हणाल्या की, डॉ. आगाशे आणि माझी 40 वर्षांची मैत्री आहे. आम्ही नेहमी भेटत नसलो, तरी एकमेकांविषयी खूप आदर आहे. मोहन केवळ अभिनेता नाही, तर अनेक गोष्टी एकावेळी करणारे व्यक्तिमत्व आहे. नेहमी चौकटी मोडणारा आणि धाडसाने धोका स्वीकारण्यास तो नेहमीच तयार असतो. यावेळी बोलताना अनुपम खेर म्हणाले की, मोहन आगाशे यांच्या छोट्याशा कार्यालयात मी काल काही वेळ घालवला. त्यांच्याशी बोलताना लक्षात आले की ती 45 मिनिटे मला जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहोत याची जाणीव करून देणारी होती.
Punya Bhushan Puraskar mohan aaghashe.
महत्वाच्या बातम्या
- पोर्ट सुदान विमानतळावर प्रवासी विमान कोसळले, चार लष्करी जवानांसह नऊ जणांचा मृत्यू!
- अजितदादांची मुख्यमंत्री पदाची पोस्टर्स; भाजप नेत्यांचा इशारा; त्यानंतर सुनील तटकरेंचा चर्चेवर पडदा!!
- शिंदे – फडणवीसांच्या देखरेखीखाली अजित दादांचे निधी वाटप; पण आता ते ठाकरे गटाच्या टीकेचे धनी!!
- नुसते मोदी – योगींच्या नावांवर अवलंबून राहू नका, संघटना वाढवा; बी. एल. संतोष यांनी घेतला भाजप कार्यकर्त्यांचा क्लास!!