- इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्स आणि लोकेश राहुलचा पंजाब किंग्स या संघांमध्ये सामना होणार आहे.
-
चेन्नईचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आयपीएल हंगामातील 8 वा सामना चेन्नई सुपर किंग आणि पंजाब किंग्जमध्ये खेळला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडेवर हा सामना खेळला जाईल. हा सामना जिंकून चेन्नई सुपर किंग आपला पहिला विजय नोंदवण्याचा संघाचा प्रयत्न असेल. तर दुसरीकडे पंजाब किंग्जच्या गोलंदाजांसाठी आज मोठी परिक्षा असणार आहे.Punjab Kings vs Chennai Super Kings : two kings fight for the win
कर्णधार केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ मैदानात उतरेल.चेन्नई समोर पंजाबचं ख्रिस गेल नावाचं वादळ उभं राहू शकतं. तर केएल राहुल देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे.
चेन्नईचा संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. दिल्ली विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला होता. सुरेश रैनाचं दमदार कमबॅक झाल्यानं चेन्नईच्या संघानं सुटकेचा श्वास घेतला आहे.
आयपीएलच्या इतिहासात हे दोन्ही संघ एकूण 23 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये चेन्नई पंजाबवर वरचढ राहिली आहे. चेन्नईने 14 मॅचमध्ये पंजाबचा पराभव केला आहे. तर पंजाबनेही 9 सामन्यांमध्ये चेन्नईवर मात केली आहे.
Punjab Kings vs Chennai Super Kings : two kings fight for the win