• Download App
    पुणे : 'नव्याने होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जिल्ह्यातच होणार , ते कुठे होणार हे आताच सांगणार नाही ' - अजित पवारPune: 'The new international airport will be in the district, we will not say where it will be' - Ajit Pawar

    पुणे : ‘नव्याने होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जिल्ह्यातच होणार , ते कुठे होणार हे आताच सांगणार नाही ‘ – अजित पवार

    विमानतळाचा फायदा हा पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदगर या जिल्ह्यांना होणार आहे.Pune: ‘The new international airport will be in the district, we will not say where it will be’ – Ajit Pawar


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्यातील विधान भवनात आयोजीत केलेल्या करोना आढावा बैठकीनंतर अजित पवार पत्रकरांशी बोलत होते. यावेळी त्यांना पुरंदर येथील विमानतळाबाबत पवार विचारले असता, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.यावेळी अजित पवार म्हणाले की , पुण्यातील नव्याने होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जिल्ह्यातच होईल. मात्र त्याची जागा आत्ता तातडीने सांगणार नाही.



    त्यामुळे विमानतळ पुरंदरला होणार की खेडला हलणार याबाबत चर्चा सुरू झाली.विमानतळाचा फायदा हा पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदगर या जिल्ह्यांना होणार आहे. विमानतळावर दोन रणवे पाहिजेत, त्यानुसार तयारी सुरू असून, जास्त चर्चा नको असेही त्यांनी सांगितले.

    आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरवातीला खेड तालुक्‍यात प्रस्तावित होते. मात्र, विविध गटांकडून होत असलेल्या विरोधामुळे विमानतळ पुरंदरला हलविण्यात आले.पुरंदर तालुक्‍यात विमानतळ येणार असल्याच्या हालचाली सुरू होताच तेथील जागा खरेदी-विक्रीची प्रकरणे वाढली. मात्र, आता पुरंदर येथील विमानतळालाही परवानगी नाकरल्यावर विमानतळ नक्की होणार कुठे, असा प्रश्‍न उपस्थित झाला.

    Pune: ‘The new international airport will be in the district, we will not say where it will be’ – Ajit Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस