• Download App
    Pune Spa Raid: Woman Dies After Jumping From Building During Police Action पुण्यात स्पा सेंटरवर कारवाई; बिल्डिंगवरून उडी मारल्याने महिलेचा मृत्यू, पुरुष जखमी

    Pune Spa Raid : पुण्यात स्पा सेंटरवर कारवाई; बिल्डिंगवरून उडी मारल्याने महिलेचा मृत्यू, पुरुष जखमी

    Pune Spa Raid

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Pune Spa Raid विमानतळ परिसरातील अहिल्यानगर रोडवरील सिटी स्पेस बिल्डिंगमधील ‘द रुट्स स्पा’ येथे स्पाच्या आडून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर विमानतळ पोलिसांनी सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांना पाहून दोघेजण दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उतरून पळण्याचा प्रयत्न करताना पडून जखमी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला तर एक पुरुष जखमी झाला आहे.Pune Spa Raid

    जखमींमध्ये स्पा मॅनेजर हुसेन शेख याचा पाय मोडला असून पश्चिम बंगालची मुळची रहिवासी असलेली ३० ते ३५ वयोगटातील एक महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. पुरुषावर ससून जनरल हॉस्पिटल येथे उपचार सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित स्पामध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली.Pune Spa Raid



    काचेचा दरवाजा तोडून आत प्रवेश

    त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या पथकाने पंचासमक्ष कारवाई केली. काचेचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर चार महिला व चार पुरुष आढळून आले. याप्रकरणी उशिरापर्यंत विमान नगर पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास सुरू आहे.

    Pune Spa Raid: Woman Dies After Jumping From Building During Police Action

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- दादा म्हणजे लाभू न शकलेले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री, विधिमंडळात अजित पवारांच्या शोकप्रस्तावावर सर्वच भावुक

    महाराष्ट्रात 4537 अंगीकृत रुग्णालयांमध्ये 2399 रोग आणि विकारांवर मोफत उपचार; मुख्यमंत्र्यांकडून ऑनलाईन शुभारंभ

    MSRTC : राज्य परिवहन मंडळाची घोषणा- आता ‘गाव तिथे एसटी’ नव्हे, ‘आदिवासी पाडा तिथे एसटी’