• Download App
    पुणे - सातारा राष्ट्रीय महामार्गावरील टोल रद्द; केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा|Pune - Satara National Highway toll canceled; Union Roads and Transport Minister Nitin Gadkari's announcement

    पुणे – सातारा राष्ट्रीय महामार्गावरील टोल रद्द; केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

    वृत्तसंस्था

    पुणे : पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण या महामार्गावरचा टोल रद्द करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. तसेच रस्त्याच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ५० कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.Pune – Satara National Highway toll canceled; Union Roads and Transport Minister Nitin Gadkari’s announcement

    केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी गडकरी बोलत होते. कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डाॅ. निलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व आमदार व अधिकारी उपस्थित होते.


    नितीन गडकरी म्हणाले, महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी एक खाजगी संस्था अभ्यास करत आहे. त्याच अहवाल सादर होणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात तब्बल १३४ कोटी रुपयांची रस्ते, पुलांची कामे होणार आहेत.

    पुणे – बंगळुरू रस्त्यावर नवे पुणे विकसित करा

    पुण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणा-या दोन रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी एक म्हणजे पुणे बंगळुरु महामार्ग. “पुणे बंगळुरु हा नवीन ग्रीन हाय-व्हे एक्सीस कंट्रोल आम्ही बांधत आहोत. या रस्त्यावर नवीन पुणे विकसित करण्याचा विचार करा. यामुळे भविष्यात पुण्याचे कंजेशन कमी होईल”,

    असा सल्ला नितीन गडकरी यांनी अजित पवार यांना दिला. लवकरच, आम्ही या महामार्गाचे प्रेझेंटेशन महाराष्ट्र सरकारला देऊ आणि कामाला सुरुवात करू तसेच पुण्यासाठी हा महामार्ग महत्त्वाचा ठरेल असे त्यांनी स्पष्ट केले.

    पुणे- मुंबईची वाहतूक कोंडी कमी होणार

    नितीन गडकरी यांनी यावेळी पुण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या आणखी एका महामार्गाची माहिती दिली आहे. “दक्षिणेतील म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ याचा उत्तरेतील म्हणजे पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, दिल्ली, हिमाचल, उत्तराखंड येथील सगळं ट्राफिक मुंबईहून पुण्याला येते.

    आम्ही ठरवलंय की हे सगळं ट्राफिक सुरतलाच थांबवू. त्यानंतर, सुरतपासून नाशिक, नाशिकहून अहमदनगर, अहमदनगर- सोलापूर आणि सोलापूरहून अक्कलकोट, गुलबर्गा, यादगीर, कर्नुल आणि चेन्नई असा हा महामार्ग १२७० किलोमीटरचा असेल. त्यावर ४० हजार कोटी रुपये खर्च करणार आहोत. यामुळे, मुंबई-पुण्याचं हे सगळं ट्राफिक कमी होईल. हा ग्रीन महामार्ग आहे. याची सध्याची लांबी १६०० किलोमीटर असून ती कमी होऊन १२७० किमी होईल. यामुळे नवीन दिल्ली-चेन्नई प्रवासात ८ तासांची बचत होणार आहे.

    Pune – Satara National Highway toll canceled; Union Roads and Transport Minister Nitin Gadkari’s announcement

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा