पोल्ट्री व्यवसायिक वाहतूकदाराच्या कोंबड्यांच्या टेम्पोवर १२ लाख ३० हजार रुपयांचा दरोडा टाकून ड्रायव्हरसह तिघांचे अपहरण करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने अखेर जेरबंद केले.
विशेष प्रतिनिधी
पुणे – पोल्ट्री व्यवसायिक वाहतूकदाराच्या कोंबड्यांच्या टेम्पोवर १२ लाख ३० हजार रुपयांचा दरोडा टाकून ड्रायव्हरसह तिघांचे अपहरण करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने अखेर जेरबंद केले. आरोपींमध्ये दोन चिकन व्यावसायिकाचा समावेश आहे. Pune rural police LCB team arrested Hen delivery tempo looting accused
याप्रकरणी टेम्पो चालक जमाल अहमद अताउल्ला खान (वय ३५, रा. ग्राम बंजेरीया, पो रमवापुर, ता, तुलसीपुर, जि. बलरामपुर, राज्य- उत्तरप्रदेश) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानसुार वैभव विद्याधर सरोदे उर्फ होगाडे (वय ३२, रा शरद नगर चिखली, पुणे), रॉकी मोंटू शेख (वय २२, रा. चिखली पुणे. मूळ रा मशीद बाग केशरडाग कलकत्ता), सुखउद्दीन जलालुद्दीन शेख (वय २२, रा. चिखली,पुणे), देविदास संतोष काकडे (वय ३१, रा नेवाळे वस्ती चिखली पुणे), वैभव लक्ष्मण कांबळे (वय २०, रा शरद नगर चिखली पुणे.) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा साथीदार सत्यम रमेश राठोड (वय १९, रा शरद नगर चिखली पुणे.) हा फरार आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमाल हे टम्पोतून मोहितेवाडी (ता. खेड, जि. पुणे) येथील सिद्धीविनायक कंपनीतर्फे वेगवेगळया पोल्ट्रीतून बॉयलर कोंबड्या भरून मुंबई येथे घाटकोपर, साकीनाका, जरीमरी, कलीना, धारावी व इतर ठिकाणी डिलेव्हरीचे काम करतात. टेम्पोवर वकील चीनकान अहमद (रा. बदलपुर, जि. बलामपुर, राज्य उत्तरप्रदेश सध्या रा. शमीउल्ला खान यांचे खोली, कुर्ला कमाणी, सुंदरबाग अशोकनगर, जि. ठाणे) हा क्लिनर तसेच सलमान मोहम्मद हबीब खान हा टेम्पोमध्ये पोल्ट्रीतून जिवंत कोंबड्या भरण्याचे व उतरविण्याचे काम करतो.गेल्या महिन्यात २९ तारखेला ते डिलीव्हरी करण्यासाठी मुंबईला जात होते. मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारांस जुन्या मुंबई पुणे महामार्गाने मुंबई बाजूस जात असताना हॉटेल मिनीमहल, अहिरवडे गावचे समोर आले असता एका पांढ-या रंगाच्या बुलेट वरून येत दोघांनी टेम्पोला ओव्हरटेक करून थांबवला. बुलेट वरील एकजणाने जमाल यांना ढकलेले व आत चढला व ड्रायव्हर सिटवर बसला. त्यावेळी डाव्या बाजुने दोनजण वर आले.
एकाने हातातील कोयता क्लिनर वकील अहमद याच्या गळयास लावला. टेम्पोसह तिघांना वडगाव मावळच्या जवळ एका भंगारच्या दुकानाच्या शेजारी शिवीगाळ करून उतरवले. तेथून टेम्पो नेत ते फरार झाले होते. जमाल यांनी कामशेत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक करत होते. तपास करत असताना सीसीटिव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील संशयित वरील पाच जणांना ताब्यात घेऊन ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने त्यांचेकडे कसून तपास केला असता गुन्हा त्यांनी केल्याची कबुली दिली आहे. या पाच जणांना पुढील तपासासाठी कामशेत पोलिस ठाण्याचे ताब्यात दिले आहे.