• Download App
    Pune Rave party रेव्ह पार्टीच्या व्याख्येवरून सरकारशी वितंडवाद; दारुड्यांच्या पार्टीला मात्र सुप्रिया सुळे + रोहित पवार आणि खडसे यांची साथ!!

    रेव्ह पार्टीच्या व्याख्येवरून सरकारशी वितंडवाद; दारुड्यांच्या पार्टीला मात्र सुप्रिया सुळे + रोहित पवार आणि खडसे यांची साथ!!

     

    नाशिक : रेव्ह पार्टीच्या व्याख्येवरून सरकारशी वितंड वाद पण दारुड्यांच्या पार्टीला मात्र सुप्रिया सुळे + रोहित पवार आणि एकनाथ खडसे यांची साथ!!, असे चित्र महाराष्ट्रभर गाजत असलेल्या रेव्ह पार्टीच्या मुद्द्यावरून निर्माण झाले.

    फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यांवरून आणि अनेक कृतींवरून सरकारला खिंडीत पकडणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची प्रांजल खेवलकर रेव्ह पार्टी प्रकरणात गोची झाली.

    एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर रेव्ह पार्टीच्या मुद्द्यात अडकल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आली. त्यातून सुटण्यासाठी सगळ्या नेत्यांनी धडपड सुरू केली म्हणून मग खेवलकर यांच्या मेडिकल रिपोर्ट पासून ते त्यांच्यावर पोलीस पाळत ठेवण्यापर्यंतचे मुद्दे उभारले गेले. एकनाथ खडसे, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे खेवलकरांच्या बचावासाठी एकवटले, तरी देखील कायदेशीर पातळीवर व्हायचे तेच झाले. न्यायालयाने प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर प्रांजल केबलकरांच्या पत्नी रोहिणी खडसे पोलीस आयुक्तांना भेटायला गेल्या पण तिथे देखील त्यांची डाळ शिजली नाही कायद्याने नाड्या आवळ्याच्या त्या आवळल्याच.



    रोहित पवारांनी ज्ञान पाजळले

    त्यामुळे सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि एकनाथ खडसे यांनी रेव्ह पार्टीच्या व्याख्येवरून सरकारशी वितंडवाद घातला. दोन-तीन हजार लोक एकत्र येऊन ड्रग्सचे सेवन केले, तर त्याला रेव्ह पार्टी म्हणतात पाच – सात लोकांमध्ये रेव्ह पार्टी होत नसते असे ज्ञान रोहित पवारांनी पाजळले. त्याआधी सुप्रिया सुळे यांनी रोहिणी खडसे यांचे समर्थन केले. त्यांचा नवरा रेव्ह पार्टीत अडकला, तर त्याला रोहिणी खडसे काय करणार?, असे म्हणून त्यांनी रोहिणी खडसेंचा बचाव केला. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या अंगात जोर आला. त्यांनी प्रांजल खेवलकरांचा बचाव सुरू केला. त्यांनी सुद्धा रेव्ह पार्टीच्या या व्याख्येवरून सरकारशी वितंडवाद घातला.

    दारुड्यांच्या पार्टीचे समर्थन

    पण या सगळ्यांमध्ये प्रांजल खेवलकर आणि ते जिथे पार्टी करत होते, तिथे पोलिसांना गांजा आणि इतर अंमली पदार्थ सापडल्याची वस्तुस्थिती कोर्टात सिद्ध झाली. पण त्यावरूनही हे सगळे अंमली पदार्थ पोलिसांनीच प्लांट केले होते. प्रांजल ठेवलकरांना पार्टीच्या ठिकाणी नंतर बोलवण्यात आले होते, असा दावा राष्ट्रवादीच्या समर्थकांनी केला. एवढे सगळे करताना आपण दारुड्यांच्या पार्टीचे समर्थन करतो आहोत हे सत्य पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विसरले.‌ या नेत्यांनी दारुड्यांच्या पार्टीचे समर्थन केले. त्यामुळे सगळे सोशल मीडियावर ट्रोल झाले. एरवी सरकारला साळसूद भाषेत नैतिकतेचे धडे देणाऱ्या सुप्रिया सुळे रोहित पवार आणि एकनाथ खडसे हे रेव्ह पार्टीच्या निमित्ताने उघड्यावर पडले.

    Pune Rave party, Supriya Sule + Rohit Pawar and Khadse support the drunkards’ party.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या दबावाचा आणि भारताने तो टांगून ठेवण्याचा इतिहास विसरलेत का??

    हिंदू दहशतवादाचा narrative NIA न्यायालयात उद्ध्वस्त; मालेगाव बॉम्बस्फोटातले आरोपी निर्दोष मुक्त!!

    Prithviraj Chavan : निवडणूक आयोगाच्या यादीवर आता काँग्रेसचा ‘वॉच’; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती