• Download App
    Khadse's Son-in-Law Arrested: Pune Rave Party, Drugs Seized कोकेन, गांजा, बिअर, 41 लाख रुपये आणि दोन मुली;

    Khadse’s Son-in-Law : कोकेन, गांजा, बिअर, 41 लाख रुपये आणि दोन मुली; एकनाथ खडसेंच्या जावयाच्या रेव्ह पार्टीत काय काय सापडले?

    Khadse's Son-in-Law

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Khadse’s Son-in-Law शहरातील खराडी परिसरात एका उच्चभ्रू गेस्ट हाऊसवर सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत सात जणांना अटक केली आहे. ‘स्टे बर्ड’ नावाच्या गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या या पार्टीदरम्यान, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्के जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन महिला, पाच पुरुषांचा समावेश असून, एकनाथ खडसेंच्या जावयाचा सहभाग आहे.Khadse’s Son-in-Law

    पोलिसांनी कारवाई करत या ठिकाणाहून कोकेन, गांजा, हुक्का पॉट आणि फ्लेवर, दारू आणि बियरच्या बाटल्यांसह इतर काही साहित्य जप्त केले आहे. तसेच पकडण्यात आलेल्या सात जणांवर एनडीपीएस अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. रविवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास पोलिसांनी ही धाड टाकली. खराडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्ट कलम 8 (क), 22 (ब), 11 (अ), 21 (ब), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या कारवाईची माहिती दिली आहे.



    पोलिसांनी जप्त केलेले साहित्य

    2.7 ग्रॅम कोकेन
    70 ग्रॅम गांजा
    हुक्का पॉट आणि फ्लेवर
    दारू आणि बीयरच्या बाटल्या
    दहा मोबाईल
    दोन चार चाकी गाड्या
    41 लाख रुपये

    अटक करण्यात आलेल्या सात आरोपींची नावे

    प्रांजल मनिष खेवलकर(41)
    निखिल जेठानंद पोपटाणी (35)
    समीर फकीर महमंद सय्यद (41)
    सचिन सोनाजी भोंबे (42)
    श्रीपाद मोहन यादव (27)
    ईशा देवज्योत सिंग (22)
    प्राची गोपाल शर्मा (22)

    पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे म्हणाले, पुढील तपास सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया असल्याने इतर बाबी या तपासाअंती समोर येतील. आरोपींचे मेडिकल केले आहे, त्याच्या काही बाबी समोर येतील. या पार्टीमध्ये अजून कुणी येणार होते का याचा तपास सुरू आहे. कुठलीही गोष्ट अधांतरी समोर येणार नाही. सर्व गोष्टी या तपासाअंती समोर येतील.

    अजित पवार काय म्हणाले?

    उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुण्यातील रेव्ह पार्टीची जी काही घटना घडली आहे, त्या घटनेचा तपास कायद्याने आणि नियमाने पुण्याचे सीपी करत आहेत. जे त्या ठिकाणी सापडलेले आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तसेच कोणीही चुकीचे वागायचे नसते आणि कोणीही चुकीचे काही करायचे नसते.

    Khadse’s Son-in-Law Arrested: Pune Rave Party, Drugs Seized

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Mahayuti BMC : महापालिकेसाठी महायुतीचा वचननामा- मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार:बेस्ट बसच्या तिकीटात महिलांना 50 टक्के सूट

    Prakash Mahajan : तुमच्या डोक्यावर कोणी नाही म्हणून बेलगाम; राज ठाकरेंच्या आरोपांवर प्रकाश महाजनांचा घणाघात; उद्धव ठाकरेंवरही निशाणा

    BMC Election 2026 : निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्या 4,521 कर्मचाऱ्यांवर आजपासून पोलिस कारवाई, एकूण 6 हजार 871 अधिकारी-कर्मचाऱ्यांना नोटिसा