Pune Poultry Farm Owner : पुण्यातील एका पोल्ट्री फार्मच्या मालकाने पोलिसांत तक्रार केली आहे की, एका कंपनीने दिलेला आहार घेतल्यानंतर त्यांच्या कोंबड्यांनी अंडी देणं बंद केलं आहे. बुधवारी एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. Pune poultry farm owner lodged a complaint in police because hens Stopped laying Eggs
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील एका पोल्ट्री फार्मच्या मालकाने पोलिसांत तक्रार केली आहे की, एका कंपनीने दिलेला आहार घेतल्यानंतर त्यांच्या कोंबड्यांनी अंडी देणं बंद केलं आहे. बुधवारी एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.
पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोक्षी म्हणाले, ‘तक्रारदार पोल्ट्री फार्मचा मालक आहे. त्यांना तसेच आणखी चार जणांना अशाच प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला, त्यानंतर त्यांनी पोलिसांत ही तक्रार नोंदविली आहे.
पोलिसांनी सांगितले की, यासंदर्भात कोणतीही एफआयआर दाखल केलेली नाही, कारण संबंधित कंपनीने अशाच प्रकारच्या समस्येचा सामना करणाऱ्या 3 ते 4 पोल्ट्री फार्मच्या मालकांना नुकसान भरपाई देण्यास सहमती दर्शविली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या कंपनीकडून कोंबड्यांची खरेदी केली. मोक्षी म्हणाले, “त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की हा आहार खाल्ल्यानंतर त्यांच्या फार्मच्या कोंबड्यांनी अंडी देणं बंद केलं.” ते म्हणाले की, पोलिसांनी अहमदनगरच्या विभागीय पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी या विषयाबाबत चर्चा केली.
Pune poultry farm owner lodged a complaint in police because hens Stopped laying Eggs
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय, उत्तर प्रदेशात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत मिळेल कोरोनाची लस
- Remdesivir Import Duty Free : सरकारने रेमडेसिव्हिरची इम्पोर्ट ड्यूटी हटवली, आणखी स्वस्त होणार इंजेक्शन, पुरवठाही वाढणार
- ‘शहरी माओवाद्यांकडून हिंसाचाराचा धोका..’ नक्षलवाद्यांविरुद्ध लढणारे निवृत्त IPS रवींद्र कदम यांनी दिला इशारा
- Corona Updates : देशात २४ तासांत पहिल्यांदाच ३ लाखांच्या जवळ आढळले रुग्ण, सर्वाधिक २०२० मृत्यू
- दहा एमबीबीएस डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात नियुक्त ; पुणे जिल्हा परिषदेची युक्ती कामाला ; मोठ्या पगाराची ऑफर दिल्याचा सकारात्मक परिणाम