वृत्तसंस्था
पुणे : बड्या बापाच्या बेट्याने दारू पिऊन आलिशान पोर्शे कार भरधाव वेगवान चालवून दोन इंजिनियर्सचे बळी घेतले, पण बेट्याच्या बड्या बिल्डर बापाने आपल्या बेट्याला सोडवण्यासाठी बड्या नेत्यांची मदत घेऊन डॉक्टरांना लाच दिली. डॉक्टरांबरोबर त्याने पैशाचा खेळ केला. त्यामुळे ससून मधले डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी होलनर यांनी बेट्याचे ब्लड सॅम्पल बदलले. Pune Porsche Accident vishal agarwal
आता बिल्डर विशाल अग्रवाल, त्याचे वडील सुरेंद्रकुमार अग्रवाल, दोन इंजिनिअर्सना चिरडणारा अल्पवयीन बेटा वेदांत अग्रवाल डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी होलनर आणि त्यांना पैसे देणारा अतुल घटककांबळे या सगळ्यांना न्यायालयाने तुरुंगाची हवा खायला लावली आहे.
ब्लड सॅम्पल बदलल्यानंतर अटक झालेल्या ससूनच्या फॉरेन्सिक लॅबचा प्रमुख डॉ. अजय तावरेने आपण गप्प बसणार नसल्याची धमकी देऊन सगळ्यांची नावे घेणार असल्याचे पोलीस चौकशी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. पैशाच्या खेळात पुण्यातल्या आमदाराचे नावही गोवले गेले आहे.
बिल्डर अग्रवाल आणि पवार यांचे संबंध अग्रवालचा आरोपी मुलगा, त्याचा वकील विशाल विशाल पाटील याचे पवारांशी संबंध हा मुळात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाच आहे. आता त्या पलीकडे जाऊन यात डॉक्टरांशी पैशाचा खेळ झाल्याने पवारांभोवतीचे संशयाचे जाळे अधिक विस्तारले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नेमक्या याच विषयावर बोट ठेवून अजित पवारांच्या मोबाईलची फॉरेनची डिपार्टमेंट मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Pune Porsche Accident vishal agarwal
महत्वाच्या बातम्या
- सावरकर जयंती दिनी अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाचे विशेष स्क्रीनिंग!!
- वर्क फ्रॉम होम ऐकलं होतं, वर्क फ्रॉम जेल पहिल्यांदाच पाहिलं, राजनाथ सिंग यांचा केजरीवालांना टोला!!
- १ जूनपासून बदलणार ‘हे’ ५ नियम ; जाणून घ्या, तुमच्या खिशावर किती परिणाम होणार? नियमांचे उल्लंघन झाले तर किती भरावा लागणार दंड
- नवी दिल्लीत भीषण दुर्घटना! बेबी डे केअर सेंटरमध्ये लागलेल्या आगीत सात बालकांचा मृत्यू