माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बेकायेशीररित्या राजकीय व्यक्तींचे फोन टॅपिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आणि याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची चौकशी पुणे पोलिसांनी सुरू केली आहे.
विशेष, प्रतिनिधी
पुणे : राजकीय नेत्यांचे वेगवेगळया नावाने फोन टॅपींग केल्याच्या आरोपावरून तत्कालिन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर दाखल गुन्ह्यात शुक्रवारी एका बड्या राजकीय व्यक्तीला पुणे पोलिसांनी आयुक्तालयात चौकशीसाठी बोलविले होते. रेकॉर्डिंगमधील आवाज हा त्यांचाच आहे का याची खात्री करून घेण्यासाठी पोलिसांनी त्यांना बोलिवले असल्याचे सुत्रांनी सांगितले. Pune police starting IPS Rashmi Shukla phone Tapping case
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख आणि मंत्री बच्चू कडू यांचे वेगवेगळ्या नावाने साठ दिवस फोन टॅपिंग केल्याच्या आरोपावरून शुक्ला यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने दिलेल्या अहवालावरून पुणे पोलिसांनी फोन टॅपींगमध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर मुंबई देखील गुन्हे दाखल झाले आहेत. पुण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पुणे पोलिसांकडून तपास केला जात आहे. या प्रकरणात फोन टॅपींग झालेल्या एका अधिकाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांन शुक्रवारी पोलिस आयुक्तालयात चौकशीसाठी बोलविले होते. या प्रकरणात रेकॉर्डिंगमधील आवाज हा त्यांचाच आहे का याची माहिती पोलिसांनी घेण्याचा प्रयत्न केला. तसेच, या प्रकरणात त्यांना आणखीन बोलविले जाण्याची शक्यता आहे. तसेच, इतरही राजकीय नेत्यांकडून या प्रकरणात माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.