• Download App
    Inspiring : पुण्याचे प्रेरणादायी Plasma Man बनले अजय मुनोत, कोरोना रिकव्हरीनंतर ९ महिन्यांत तब्बल १४ वेळा प्लाझ्मा दान । Pune Plasma man Ajay Munot Who donates plasma for a record 14 times Since Covid Recovery

    Inspiring : पुण्याचे Plasma Man अजय मुनोत, कोरोना रिकव्हरीनंतर ९ महिन्यांत तब्बल १४ वेळा प्लाझ्मा दान

    Plasma Man : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेशी सध्या आपला देश संघर्ष करत आहे. कोरोनावर इतर औषधोपचारांप्रमाणेच प्लाझ्माचे उपचारांनाही वरदानाइतकंच महत्त्व आहे. यामुळेच कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींना वेळोवेळी प्लाझ्मा दान करण्यास सांगितलं जातं. कोरोना संसर्ग आणि रुग्णांसाठी प्लाझ्माची आवश्यकता याचा विचार करून पुणे येथील एका व्यक्तीनं प्लाझ्मा दान करण्याचा जणू विक्रमच केला आहे. नऊ महिन्यांमध्ये त्यांनी तब्बल 14 वेळा प्लाझ्मा दान केला आहे. Pune Plasma man Ajay Munot Who donates plasma for a record 14 times Since Covid Recovery


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेशी सध्या आपला देश संघर्ष करत आहे. कोरोनावर इतर औषधोपचारांप्रमाणेच प्लाझ्माचे उपचारांनाही वरदानाइतकंच महत्त्व आहे. यामुळेच कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींना वेळोवेळी प्लाझ्मा दान करण्यास सांगितलं जातं. कोरोना संसर्ग आणि रुग्णांसाठी प्लाझ्माची आवश्यकता याचा विचार करून पुणे येथील एका व्यक्तीनं प्लाझ्मा दान करण्याचा जणू विक्रमच केला आहे. नऊ महिन्यांमध्ये त्यांनी तब्बल 14 वेळा प्लाझ्मा दान केला आहे.

    ‘इंडियन एक्स्प्रेस’ने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार पुण्यातील या चालती फिरती प्लाझ्मा बँक म्हणून त्यांना ओळखलं जातंय. ही कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे अजय मुनोत. 50 वर्षे वय असलेल्या अजय मुनोत यांनी आपल्या आईकडून प्लाझ्मा दानाची प्रेरणा मिळाल्याचं म्हटले आहे. मुनोत यांच्या आईचा रक्तगट ‘O’ निगेटिव्ह होता. त्या युनिव्हर्सल डोनर असल्यानं त्या कोणत्याही ब्लड ग्रुपच्या व्यक्तीसाठी रक्तदान करू शकत होत्या. त्यामुळंच त्यांना पुण्याच्या आर्मी ऑफिसमधून अनेकदा फोन यायचे. आई अनेकदा रक्तदानासाठी जायची. आईची हीच शिकवण मुनोत यांना कोरोनाच्या या संकटात इतरांना मदत करण्याची प्रेरणादायी ठरली.

    कोरोना महामारीच्या सुरुवातीच्याच काळात जुलै 2020 मध्ये अजय मुनोत यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली. बरे झाल्यावर मात्र ते थांबले नाहीत शरीरात तयार होणाऱ्या अँटिबॉडीज प्लाझ्माद्वारे दान करणे त्यांनी सातत्याने सुरू ठेवले. अजय मुनोत ज्या ठिकाणी प्लाझ्मा डोनेट करतात तेथील डॉक्टरांनी म्हटलं की, कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यावर अजय मनोत ते प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी येऊ लागले. प्रत्येकवेळी त्यांची योग्य तपासणी झाली. ICMRने प्लाझ्मा दान करण्याचा टाइटर रेट 1.640 पेक्षा अधिक असावा असं सांगितलं आहे. डॉ. जोशी म्हणतात की, मुनोत यांचा टाइटर रेट सध्या 3 ते 4 दरम्यान आहे.

    अजय मुनोत यांच्या शरीरात अँटिबॉडी अधिक वेगाने बनत आहेत. त्यांचा टायटर रेटही अत्यंत चांगला आहे. 14 वेळा प्लाझ्मा दान करणारे अजय मुनोत एकटे नाहीत तर याच प्लाझ्मा बँकेत राम बांगर नावाच्या व्यक्तीनंही 14 वेळा प्लाझ्मा दान केल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळं याद्वारे कोरोना रुग्णांना जीवदान देण्यासाठी असे डोनर मदत करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

    Pune Plasma man Ajay Munot Who donates plasma for a record 14 times Since Covid Recovery

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य