• Download App
    Pune - Nashik पुणे - नाशिक थेट अति जलद रेल्वे, पण आता नव्या मार्गाने; पुणतांबा आणि अहिल्यानगरचाही मार्गात समावेश

    पुणे – नाशिक थेट अति जलद रेल्वे, पण आता नव्या मार्गाने; पुणतांबा आणि अहिल्यानगरचाही मार्गात समावेश

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पुणे आणि नाशिक या शहरांना जोडणारी थेट रेल्वे गाडी अजून नाही. पुणे ते नाशिक अशी थेट अति जलद रेल्वे दृष्टीपथात आली असून ती नव्या मार्गाने सुरू करण्याचे सूतोवाच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात लेखी उत्तरात केले. Pune – Nashik

    पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणारी रेल्वे हा विषय गेली अनेक वर्षे केंद्र आणि राज्य सरकार यांच्या चर्चेच्या पातळीवरच आहे. त्यासाठी अनेकदा वेगवेगळे मार्ग सुचविण्यात आले. काही ठिकाणी भूसंपादन झाले. परंतु, प्रत्यक्षात थेट रेल्वे मार्ग अस्तित्वात आला नाही.



    आता मात्र केंद्र सरकारने पुणे – नाशिक थेट रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून ही रेल्वे नव्या मार्गाने सुरू करण्याचे सूतोवाच अश्विनी वैष्णव यांनी केले. या नव्या मार्गात नाशिक रोड – साईनगर शिर्डी – पुणतांबा – निंबळक – अहिल्यानगर आणि पुणे या स्थानकांचा समावेश होऊ शकतो त्याचा विकास आराखडा सरकारकडे आला आहे. त्यासाठी रेल्वे मार्ग तयार करण्याचे काम देखील सुरू आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. साईनगर शिर्डी – पुणतांबा आणि निंबळक – अहिल्यानगर अशा मार्गांवर दुहेरी रेल्वे मार्ग टाकायचे काम सुरू आहे. साईनगर शिर्डी – पुणतांबा दुहेरी रेल्वे मार्गासाठी 240 कोटी रुपये सरकारने मंजूर केलेत, अशी माहिती सुद्धा अश्विनी वैष्णव यांनी दिली.

    Pune – Nashik direct high-speed train

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    सहा तास चर्चा करून सुद्धा सुप्रिया सुळे अपयशी; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादीचा राजीनामा!!

    फडणवीस सरकारचा निर्णय; नगराध्यक्षांना नगरपरिषदां मध्ये सदस्यत्व आणि मताचाही अधिकार; नेमका अर्थ काय??

    फडणवीस म्हणाले, ठाकरे म्हणजे मुंबई नाहीत; पण 22 वर्षांच्या मुलीने दाखवून दिले, पवार म्हणजे बारामती नाहीत!!