विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पुणे आणि नाशिक या शहरांना जोडणारी थेट रेल्वे गाडी अजून नाही. पुणे ते नाशिक अशी थेट अति जलद रेल्वे दृष्टीपथात आली असून ती नव्या मार्गाने सुरू करण्याचे सूतोवाच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात लेखी उत्तरात केले. Pune – Nashik
पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणारी रेल्वे हा विषय गेली अनेक वर्षे केंद्र आणि राज्य सरकार यांच्या चर्चेच्या पातळीवरच आहे. त्यासाठी अनेकदा वेगवेगळे मार्ग सुचविण्यात आले. काही ठिकाणी भूसंपादन झाले. परंतु, प्रत्यक्षात थेट रेल्वे मार्ग अस्तित्वात आला नाही.
आता मात्र केंद्र सरकारने पुणे – नाशिक थेट रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून ही रेल्वे नव्या मार्गाने सुरू करण्याचे सूतोवाच अश्विनी वैष्णव यांनी केले. या नव्या मार्गात नाशिक रोड – साईनगर शिर्डी – पुणतांबा – निंबळक – अहिल्यानगर आणि पुणे या स्थानकांचा समावेश होऊ शकतो त्याचा विकास आराखडा सरकारकडे आला आहे. त्यासाठी रेल्वे मार्ग तयार करण्याचे काम देखील सुरू आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. साईनगर शिर्डी – पुणतांबा आणि निंबळक – अहिल्यानगर अशा मार्गांवर दुहेरी रेल्वे मार्ग टाकायचे काम सुरू आहे. साईनगर शिर्डी – पुणतांबा दुहेरी रेल्वे मार्गासाठी 240 कोटी रुपये सरकारने मंजूर केलेत, अशी माहिती सुद्धा अश्विनी वैष्णव यांनी दिली.
Pune – Nashik direct high-speed train
महत्वाच्या बातम्या
- Sheetal Tejwani : शीतल तेजवानीला अखेर अटक; मुंढवा येथील अमेडिया कंपनीच्या व्यवहाराप्रकरणी कारवाई
- गोदावरी वाहणार खळखळ आणि निर्मळ; क्लीन गोदावरी बाँड्सचे नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टिंग!!
- पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात शितल तेजवानीला अटक; पार्थ अजून मोकळाच!!
- Pakistan : पाकने श्रीलंकेला एक्सपायर झालेले मदत साहित्य पाठवले; पूरग्रस्तांना पाठवलेल्या फूड पॅकेटचे फोटे व्हायरल