• Download App
    पुणेकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी.. पु ल देशपांडे उद्यानाचा तिसरा टप्पा होणार पूर्ण ... Pune Municipal Corporation Take A Charge Of Kala Gram Project ..

    पुणेकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी.. पु ल देशपांडे उद्यानाचा तिसरा टप्पा होणार पूर्ण …

    कलाग्राम प्रकल्पासाठी महापालिका आयुक्तांची अर्थसंकल्पात चार कोटींची तरतूद..

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : सिंहगड रस्त्यावर असलेलं पु ल देशपांडे उद्यान हे पुण्यातील प्रसिद्ध उद्यानापैकी एक आहे .. या उद्यानाची रचना जपानी पद्धतीची असून… पूर्वी या उद्यानाचे नाव “पुणे ओकोयामा मैत्री उद्यान” हे होतं ..हे उद्यान जपान मधील ओकोयामा शहरातील ३०० वर्षापूर्वीच्या प्रसिद्ध कोराक्वेन उद्यानाच्या धर्तीवर विकसित केलेले भारतातील एक उद्यान आहे. Pune Municipal Corporation Take A Charge Of Kala Gram Project ..

    पहिल्या टप्प्यात जपानी पद्धतीचा आणि नंतरच्या टप्प्यात मुघल पद्धतीचं उद्यान बांधण्यात आलं होत आणि आता येत्या वर्षभरात याच उद्यानामध्ये कलाग्राम प्रकल्प साकारण्यात येणार आहे … त्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून अर्थसंकल्पामध्ये चार कोटींची तरतूद केली आहे.. साडेतीन एकर वर हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे.

    या कलाग्रामात विविध हस्तकलांच्या वस्तूंसाठी आणि हातमागांच्या वस्तू साठी वेगवेगळ्या प्रकारच्या दगडापासून आणि बांबूंपासून तीस गाळे बांधण्यात येणार आहेत … या कलाग्राम प्रकल्पामुळे पुणेकरांना विविध राज्यातील लोककला आणि ग्रामीण कलाकृतीं पुणेकरांना एकाच छताखाली पाहायला मिळणारे आहेत ..

    या उद्यानात ६०० आसन व्यवस्था असलेलं ऍम्पिथिएटर आणि 60 गाड्यांचे ड्राइव्ह इन थिएटर बांधण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेकडून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे..
    या कलाग्राम मुळे आधीच सुंदर असलेल्या पु ल देशपांडे उद्यानात आणखी सौंदर्याची भर पडणार आहे..

    Pune Municipal Corporation Take A Charge Of Kala Gram Project ..

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!