• Download App
    Pune Municipal Corporation पुणे महापालिकेचा १५ हजार ६६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर; महिला, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर!

    Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेचा १५ हजार ६६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर; महिला, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर!

    Pune Municipal

    विशेष प्रतिनिधी

    पुणे: पुणे महानगरपालिकेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अर्थसंकल्प आज महापालिकेच्या मुख्य सभेत सादर करण्यात आला. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी १५,६६९ कोटी रुपयांचे हे अंदाजपत्रक सभागृहासमोर मांडले. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्तांनी यापूर्वी १३,९९५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते, त्यात स्थायी समितीने १,६७४ कोटी रुपयांची भर टाकून पुणेकरांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी घोषणा केल्या आहेत.Pune Municipal Corporation

    महिला आणि ज्येष्ठांसाठी मोठ्या सवलती

    या अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरणावर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

    * मिळकतकरात सवलत: ज्या महिलांच्या नावावर ५०० चौरस फुटांपर्यंतची मालमत्ता आहे, त्यांना मिळकतकरात ५०% सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.Pune Municipal Corporation



    * पिंक रूम व स्वच्छतागृहे: महापालिकेच्या ७५ शाळांमध्ये मुलींसाठी ‘पिंक रूम’ आणि शहरात महिलांसाठी १०० स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत.

    * ज्येष्ठ नागरिक: पीएमपी प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना आता ५०% सवलत मिळणार आहे.

    * आरोग्य सेवेचा विस्तार: ‘अजित पवार’ शहरी गरीब योजना आरोग्य क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे:

    * शहरी गरीब योजनेसाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, या योजनेला आता ‘अजित पवार शहरी गरीब योजना’ असे नाव देण्यात आले आहे.

    * कॅन्सर आणि डायलिसिसच्या रुग्णांना आता ३ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील.

    * गंगाधाम परिसरात नवीन एमआरआय आणि सिटी स्कॅन सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

    * महापालिका रुग्णालयांमध्ये आता आयव्हीएफ (IVF) सेवा देखील सुरू करण्यात येणार आहे.

    पर्यावरण आणि पर्यटनासाठी ‘मिराकल’ संकल्पना

    पुण्याला अधिक हिरवेगार आणि पर्यटनस्नेही बनवण्यासाठी अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत.

    * शहरात तब्बल ५० लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
    * मिराकल गार्डन: दुबईच्या धर्तीवर पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मिराकल गार्डन’ आणि ‘नमो गार्डन’ उभारले जाणार आहे.
    * सारसबाग आकर्षण: सारसबागेत पर्यटकांसाठी काचेचा पूल (Glass Bridge) उभारला जाईल, तसेच
    * सारसबाग ते पर्वती दरम्यान रोप-वे करण्याचे नियोजन आहे.

    क्रीडा आणि सांस्कृतिक विकास

    * क्रीडा: पंडित नेहरू स्टेडियमचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास केला जाईल. तसेच दिव्यांग खेळाडूंसाठी स्वतंत्र क्रीडा प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे.
    * कला: बाणेर-बालेवाडी परिसरात नवीन नाट्यगृह आणि ‘पुणे कला अकादमी’ उभारली जाईल. ऐतिहासिक बालगंधर्व रंगमंदिराचाही पुनर्विकास करण्यात येणार आहे.

    उत्पन्न वाढ आणि पायाभूत सुविधा!

    महापालिकेने उत्पन्न वाढवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत:

    * थकबाकी वसुली: केंद्र आणि राज्य सरकारच्या थकबाकी वसुलीसाठी विशेष कक्ष स्थापन केला जाईल.
    * कर आकारणी: समाविष्ट गावांमध्ये नियमानुसार कर आकारणी केली जाईल. तसेच नवीन मिळकतींच्या कर आकारणीसाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर विशेष शिबिरे आयोजित केली जातील.

    मेट्रो: शहराच्या कानाकोपऱ्यात

    मेट्रोचा विस्तार करण्यासाठी आणि पीएमपीसोबत एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्यावर भर दिला जाईल.

    यंदाचा अर्थसंकल्प हा मध्यमवर्गीय पुणेकर, महिला आणि आरोग्याच्या गरजांना प्राधान्य देणारा असून, शहराच्या सुशोभीकरणासाठी ‘ग्लोबल’ व्हिजन ठेवणारा आहे. आता या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांचे उद्दिष्ट किती पूर्ण होतात. हे पाहाणं महत्वाचं असणार आहे.

    Pune Municipal Corporation Presents ₹15,669 Crore Budget for 2026-27; Special Focus on Women, Health, and Infrastructure

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पुणे परिसरात विराट हिंदू संमेलनांचा धडाका; नव्या वस्त्या, वसाहतींमध्ये संघाचा मोठा जनसंपर्क

    प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंच्या दबावामुळेच जय पवारची पत्रकार परिषद रद्द; रोहित पवारांचा आरोप

    दैवी अवतार असल्याचे सांगून अशोक खरात कडून महिलांवर बलात्कार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत हादरवणारी माहिती