• Download App
    पुणेकरांसाठी खुशखबर .. महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात सवलत पुन्हा लागू..| Pune Municipal Corporation Declared The Some Discount Of The Property Tax..

    पुणेकरांसाठी खुशखबर .. महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात सवलत पुन्हा लागू..

    मंत्रीमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची शहराचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुणे महापालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत यापुर्वी मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर नागरिकांची असलेली अनेक वर्षांपासुनची मागणी लक्षात घेता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन मार्च २०२३ मध्ये अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पुणेकरांच्या या मागणीकडे लक्ष वेधलं होतं.. Pune Municipal Corporation Declared The Some Discount Of The Property Tax..



    बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली..

    पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कर आकारणी करतांना वार्षिक भाड्यातून १० टक्के ऐवजी १५ टक्के सवलत आणि मालमत्ताधारक स्वत: राहण्यासाठी मालमत्तेचा वापर करत असल्यास त्यांना वार्षीक मालमत्ता करपात्र रक्कम निश्चित करतांना ४० टक्के सवलत देण्यास शासनान मान्यता दिली. आहे..

    Pune Municipal Corporation Declared The Some Discount Of The Property Tax..

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!