• Download App
    पुणे महापालिकेकडून ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जाहीरPune Municipal Corporation announces new rules on the backdrop of Christmas

    पुणे महापालिकेकडून ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जाहीर

    नवीन वर्षाच्या सणाला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे राज्य आणि स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याचा विचार सुरु आहे.Pune Municipal Corporation announces new rules on the backdrop of Christmas.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. गुरुवारी पुणे जिल्ह्यात ओमायक्रॉनचे १३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे.दरम्यान ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सणाला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

    त्यामुळे राज्य आणि स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याचा विचार सुरु आहे. ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.



    अशी असेल नियमावली

    १)ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता नाताळ सण साधापणाने साजरा करा.
    २) सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन व्हावे, मास्कचा वापर करावा.
    ३) चर्चमध्ये प्रार्थनेसाठी केवळ 50 टक्के उपस्थिती बंधनकारक
    ४) चर्च आणि इतर ठिकाणी गर्दी करु नका.
    ५)चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री आयसह अन्य सजावट केल्यास गर्दी होणार नाही यासाठी उपाययोजना करा.
    ६) चर्चबाहेर स्टॉल किंवा दुकान लावण्यास बंदी.
    ७)मिरवणुका आणि फटाक्यांच्या आतषबाजीवरही बंदी.

    Pune Municipal Corporation announces new rules on the backdrop of Christmas

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!