• Download App
    आता १५ डिसेंबरपासून सुरू होणार पुणे मुंबईच्या शाळा ; वर्षा गायकवाड यांनी दिली माहितीPune-Mumbai schools to start from December 15; Information provided by Varsha Gaikwad

    आता १५ डिसेंबरपासून सुरू होणार पुणे मुंबईच्या शाळा ; वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

    कोरोना व्हायरसचा नवा ओमिक्रोनचा व्हेरिएंट आल्यामुळे मुंबई , पुणे येथील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.Pune-Mumbai schools to start from December 15; Information provided by Varsha Gaikwad


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोनाच सावट कमी झाल्याने राज्यात हळू हळू निर्बंध शिथिल करण्यात आले होते. दरम्यान शाळा ही सुरू करण्यात आल्या होत्या. दिवाळीच्या सुट्टी नंतर १ डिसेंबरला शाळा पुन्हा सुरू होणार होत्या.

    परंतु याच दरम्यान आता ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे १ डिसेंबर ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.ही माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.कोरोना व्हायरसचा नवा ओमिक्रोनचा व्हेरिएंट आल्यामुळे मुंबई , पुणे येथील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.



    पुढे वर्षा गायकवाड म्हणाल्या की , स्थानिक पातळीवर निरीक्षण करुन, शाळांविषयी निर्णय घेतला जाईल.दरम्यान मुंबई पुण्यातील शाळा १५ डिसेंबर पासून सुरू करण्यात येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

    टास्क फोर्सशी चर्चा करून त्याच सोबत कोरोना व ओमायक्रॉनच्या संसर्गाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.अस वर्षा गायकवाड म्हणाल्या.

    Pune-Mumbai schools to start from December 15; Information provided by Varsha Gaikwad

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    राज्याची आर्थिक परिस्थिती ओढाताणीची पण राज्य कुठेही दिवाळखोरीकडे नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    निलंबित टीएमसी आमदार हमायून कबीर एआयएमआयएम सोबत आघाडीची घोषणा; बंगाल निवडणुकीत ‘गेम-चेंजर’ ठरणार असल्याचा दावा