पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.त्यांना सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी टेस्ट केली.Pune: Mayor Muralidhar Mohol infected with corona; Tweeting information
विशेष प्रतिनिधी
पुणे : दिवसेंदिवस कोरोना वाढतच चालला आहे.सध्या पुणे शहरात 44 हजार 452रुग्ण सक्रिय आहेत. तर आतापर्यंत शहरात एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 9 हजार 209 झाली आहे.अशातच शहरातील पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.त्यांना सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी टेस्ट केली.दरम्यान टेस्ट केल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे.
महापौर म्हणाले की , ” कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर RT-PCR चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी.तसेच आपल्या सगळ्यांच्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेन.”अशी माहिती त्यांनी ट्विटर वरून दिली आहे.
Pune: Mayor Muralidhar Mohol infected with corona; Tweeting information
महत्त्वाच्या बातम्या
- UP Elections : ‘लडकी हूँ लड सकती हूँ’ घोषणेला पक्षातूनच छेद, काँग्रेस महिला उमेदवाराचा ढसढसा रडत जिल्हाध्यक्षावर गंभीर आरोप, निवडणूक लढण्यास नकार
- मंत्रालयांनी कसे केले कचऱ्याचे कॅफेटेरिया अन् वेलनेस सेंटर्समध्ये रूपांतर, अशी स्वच्छता मोहीम जिने प्रशासकीय कामात सौंदर्य भरले
- लता मंगेशकरांच्या प्रकृतीत सुधारणा
- India-Central Asia Summit : पीएम मोदी म्हणाले- अफगाणिस्तानातील घडामोडींबाबत आपण सर्वच चिंति, परस्पर सहकार्य जास्त महत्त्वाचे