• Download App
    Pune police डिलिव्हरी बॉयने बलात्कार केल्याची खोटी बातमी पसरवून पुणे

    Pune police : डिलिव्हरी बॉयने बलात्कार केल्याची खोटी बातमी पसरवून पुणे असुरक्षित असल्याची बदनामी; पुणे पोलिसांनी चालवली fake narrative वर काठी!!

    Pune police

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Pune police डिलिव्हरी बॉयने तोंडावर स्प्रे मारून 22 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. पुणे आता सर्वसामान्य महिलांसाठी सुरक्षित असलेले शहर उरले नाही असा fake narrative पसरवायचे काम काही लोकांनी केले, पण पुणे पोलिसांनी संबंधित केसचा 24 तासांच्या आत निकाल लावून ती केसच खोटी असल्याचे सिद्ध केले, अशा परखड शब्दांमध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी fake narrative पसरवणाऱ्यांचा पर्दाफाश केला.Pune police



    कुठलीही खोटी बातमी पसरवून पुणे असुरक्षित असल्याची बदनामी करायची टोळीच कार्यरत दिसते. पुणे पूर्वी सुरक्षित होते पण आता पुण्यातली कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहिलेली नाही. अशा बातम्या सतत पसरवण्याचे उद्योग काही लोक करतात. सोसायटीत शिरून डिलिव्हरी बॉयने तोंडावर स्प्रे मारून 22 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची बातमी अशीच मुद्दाम पसरवली गेली. वास्तविक तो मुलगा संबंधित मुलीचा बॉयफ्रेंड निघाला. दोघांमध्ये काही विशिष्ट गोष्टींवरून वाद झाला त्यामुळे त्या मुलीने बलात्कार झाल्याची खोटी तक्रार दिली. पुणे पोलिसांनी 24 तासांच्या आत या सगळ्या प्रकाराचा तपास करून सत्य समोर आणले. पण या बातमीच्या निमित्ताने पुण्याची बदनामी करायचा पुरेपूर प्रयत्न झाला, असे टीकास्त्र अमितेश कुमार यांनी सोडले.

    पुणे शहर सर्वांसाठी कालही सुरक्षित होते. आजही सुरक्षित आहे आणि उद्याही सुरक्षित राहील. कुठल्यातरी खोट्या बातम्या पसरवून पुणे असुरक्षित असल्याची खोटी भावना कुणीही निर्माण करू नये. तसे करायचा कुणी प्रयत्न केला तर ते आणून पाडण्यासाठी पुणे पोलीस सक्षम आहेत. पुण्यातली कायदा आणि सुव्यवस्था स्थिती चांगली आहे, असेही अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

    Pune is being defamed as unsafe by spreading false news of rape by delivery boy; Pune police crack down on fake narrative!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पूर आला, पण भक्तीचा ओघ नाही थांबला; भर पावसातही गोदावरी मातेची महाआरती संपन्न

    ठाकरे बंधूंच्या ऐक्याचा आशिष शेलार यांनाच पहिला राजकीय धोका, म्हणून मनसेवर केली हीन पातळीची टीका!!

    MLA Rajesh Kshirsagar : शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा नाही, तर राजकीय विरोध, आमदार राजेश क्षीरसागर यांचा आरोप