• Download App
    पुणे : लागा तयारीला ...पोलिस भरतीची तारीख जाहीर!केंद्र सरकारची भरती प्रक्रिया करण्यास परवानगी ...असा करा अर्ज । Pune: Get ready ... Date of Police Recruitment Announced! Permission of Central Government for recruitment process ... Apply

    पुणे : लागा तयारीला …पोलिस भरतीची तारीख जाहीर!केंद्र सरकारची भरती प्रक्रिया करण्यास परवानगी …असा करा अर्ज

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : कोरोना महामारीमुळे गेले दोन वर्ष भरती प्रक्रिया रखडली होती. अशातच आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना केंद्र सरकारने राज्यांना भरती प्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. Pune: Get ready … Date of Police Recruitment Announced! Permission of Central Government for recruitment process … Apply

    शहरातील पोलीस दलातील 214 जागांसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे त्यांची लेखी परीक्षा येत्या 5 ऑक्टोबरला शहरातील विविध केंद्रावर होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.



    मागील काही वर्षात झालेल्या भरती प्रक्रियेत बराच घोळ झाल्याचा दिसून आलं होतं. त्यामुळे यंदा पोलीस पदाच्या परीक्षा स्वतंत्र खासगी संस्थेकडून घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे शहरातील पोलीस दलातील 214 रिक्त जागांसाठी तब्बल 39 हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

    पुणे शहरातील पोलीस पदाच्या लेखी परिक्षेसाठी प्रवेशपत्र उमेदवारांना ई-मेलद्वारे पाठवण्याची प्रक्रिया येत्या बुधवारपासून सूरू होणार आहेत, लेखी परिक्षासाठी उमेदवारांनी ओळखपत्र काळजीपूर्वक केंद्रावर घेऊन यावं, त्याशिवाय परीक्षेला बसू दिलं जाणार नाही, असं पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं आहे.

    लेखी परिक्षासाठी उमेदवारांना प्रवेश पत्र http://mahapolicerecmahaitexam या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील 143 केंद्रावर या पदासाठी परिक्षा होणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी विहित ओळखपत्रासह केंद्रावर उपस्थित राहावे. उमेदवारांना काही अडचणी असल्याच शहर नियंत्रण कक्षाशी त्याचबरोबर 9699792230 / 8999783728 किंवा 9309868270 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन पोलीस गु्प्ता यांनी केलं आहे.

    Pune: Get ready … Date of Police Recruitment Announced! Permission of Central Government for recruitment process … Apply

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!