विशेष प्रतिनिधी
पुणे : शरद पवारांनी महाराष्ट्रात महिला धोरण आणले. त्यांनी मुलीला मुलाप्रमाणे वाढविले. महाराष्ट्रात महिलांना आरक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण केले, अशा डिंग्या त्यांच्या समर्थकांनी अनेक वेळा मारल्या. खासदार सुप्रिया सुळे तर नेहमीच आई वडिलांच्या संस्कारांच्या बाता मारत असतात. पण पवारांनीच निर्माण केलेल्या आणि वाढवून ठेवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर नेमके कुठले “संस्कार” झाले, ते सगळे बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरणातून उघड्यावर आलेच होते. आता त्यापुढे जाऊन घरातल्या सुनांचा हुंडाबळी घेण्यापर्यंत “पवार संस्कारितांची” मजल गेल्याचे पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातून उघड्यावर आले. vaishnavi hagawane
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुळशी तालुकाप्रमुख राजेंद्र हगवणे यांनी त्यांच्या घरच्यांनी सून वैष्णवी शशांक हगवणे हिचा हुंडाबळी घेतला. पण राजकीय दबावामुळे त्यांना अजून अटक झालेली नाही.
वैष्णवी (वय २३) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुळशी तालुक्यातील भुकूम येथे शुक्रवारी (दि. 16 मे) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलाने तसेच त्यांच्या घरातल्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिल्यानेच वैष्णवी यांनी आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली. राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे फरार झाले. पण पोलीस त्यांना अद्याप करू शकले नाहीत.
शुक्रवारी 16 मे रोजी दुपारी साडे‑चारच्या सुमारास वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. आत्महत्या केलेल्या सूनेच्या आईवडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केलाय. हुंड्यासाठी आपल्या लेकीचा छळ सुरू होता. त्यातून तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप वैष्णवीच्या आई-वडिलांनी केला आहे
– वैष्णवीच्या जावेने देखील तक्रार दिली होती
ज्याप्रमाणे हगवणे कुटुंबीयांने घरातील लहान सुनेचा अमानुषपणे छळ केला, त्यामुळे तिने आपलं जीवन संपवलं, अगदी असंच काहीसा मोठ्या सुनेचा ही छळ हगवणे कुटुंबीयांनी केला. नोव्हेंबर 2024 मध्ये हगवणेंच्या मोठ्या सुनेने पौड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती, त्याबाबत गुन्हा ही दाखल केलाय. सासरे राजेंद्र यांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आणि मनास लज्जा निर्माण होईल असं कृत्य केलं. मात्र तेव्हा ही राजकीय दबावापोटी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तेव्हाच कठोर कारवाई झाली असती तर कदाचित लहान सून वैष्णवीवर हे टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली नसती. आता एवढं होऊन ही अजित पवारांचे पदाधिकारी असलेले सासरे राजेंद्र पोलिसांच्या हाती लागेना झालेत, त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
– 51 तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी
राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी घेतली. एवढंच नाही तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करुन देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करुन दिलं, अशी माहिती एफआयरमधून समोर आली आहे.त्याचबरोबर ते सर्वजण कोणत्याही कारणात्सव वाद घालून तिच्याबरोबर भांडण करत. लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागीतली ती दिली नाहीत म्हणुन त्याचा राग मनात धरुन सून वैष्णवीस घालुन पाडुन बोलून तिचे चारित्र्यावर संशय घेत सासु लता, नंनंद करीश्मा हागवणे, सासरे राजेंद्र हागवणे, दिर सुशील हगवणे यांनी शारीरीक व मानसिक त्रास देणं सुरू केलं, अशी माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे.
हे बाळ माझे नाही…
एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी ऑगस्ट 2023 मध्ये गरोदर असताना याची माहिती पती शशांक याला सांगितली असताना त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन हे बाळ माझे नाही दुसऱ्या कोणाचे तरी असेल असे म्हणून पती शशांक आणि सासरचे लोकांनी तिच्यासोबत भांडण करुन तिला मारहाण केली होती. त्यामुळे शशांक याने वैष्णवी हीस जबरदस्तीने शिवीगाळ व मारहाण करुन माझ्या घरातून चालती हो, नाहीतर मी तुला हाकलुन देईन असे म्हणुन राहते घरातुन हाकलून दिले होते. त्यानंतर वैष्णवी ही माहेरी आल्यानंतर तिने तिच्यासोबत होत असलेल्या छळवणुक व हुड्यासाठी पैशाची मागणी याबाबतची माहिती तिच्या आईवडीलांना दिली होती. त्याचबरोबर सासरच्या कुटुंबियांकडुन मानसिक त्रास सहन न झाल्याने दि. 27 नोव्हेंबर 2023 रोजी वैष्णवीने जाचाला कंटाळुन औषध (रेंट पॉईझन) जेवणातून खावून स्वःचा जीव संपवण्याचा प्रयत्न केला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जमीन खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी
जेव्हा पहिल्यांदा वैष्णवीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा तिला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यामुळे तिचा जीव वाचला होता, तिच्यावरती 4 दिवस उपचार सुरू असताना तिचे सासरचे कोणतेही नातेवाईक तिला बघण्यासाठी देखील दवाखान्यात गेले नाहीत, त्यानंतर वैष्णवीची तब्येत ठीक झाल्यानंतर तिला पुन्हा सासरी पाठवुन देण्यात आलं. त्यानंतर साधारण 15 दिवसानंतर तिचा पती शशांक याने वैष्णवीच्या माहेरी जमीन खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली. त्यावेळी तिच्या माहेरून पैसे न मिळाल्याने जावई शशांक यांनी घरी जाऊन वैष्णवी हिस ‘तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत, तुझ्या बापाला काय भिक लागली काय, मी तुला काय फुक्कट पोसणार आहे काय, तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत तर मी तुझ्या आख्या खानदानाचा काटाच काढतो’ असं म्हणत वैष्णवीला धमकी दिली होती. याबाबत वैष्णवीने माहेरी सांगितले असल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयात वैष्णवीचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. डॉ.जयदेव ठाकरे आणि डॉ. ताटिया यांच्या अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत. शरीरावरती रक्त साकाळल्याचे डाग आहेत.अंतर्गत अवयव आणि इतर नमुने रासायनिक तपासणीसाठी राखून ठेवण्यात आलेले आहे. वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत असले तरी वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने तिची हत्या करण्यात आल्याचा संशय नातेवाईंकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी वैष्णवीच्या हत्येच्या दिशेने तपास करावा, अशी मागणी तिच्या कुटुंबियांनी केली आहे.
pune dowry harassment case ncp leaders daughter in law vaishnavi hagawane
महत्वाच्या बातम्या
- Corona virus : कोरोना व्हायरसने पुन्हा वाढवली चिंता, आरोग्य विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून
- पहलगाम हल्ल्याची, नंतर भारताचा मार खाल्ल्याची जनरल असीम मुनीरला बक्षीसी; फील्ड मार्शल पदी बढती!!
- Piyush Goyal : भारत-अमेरिका व्यापार करारावरील चर्चा यशस्वी – केंद्रीयमंत्री पियुष गोयल
- Waqf सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले; सबळ पुरावा नसताना हस्तक्षेपाला नकार!!