पुणे जिल्ह्यात जमिन अकृषक दाखवण्यासाठी (नॉन अॅग्रीकल्चर) दाखवण्याच्या कामात अनेक बनावट आॅर्डर तसेच भोगवटा प्रमाणपत्राच्या आधारे ११२ दस्तांची नोंद केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबतची पडताळणी केल्यावर तब्बल ११० एनएच्या आर्डर या बनावट असल्याची धक्कादायक माहिती पुण्यात उघडकीस आली आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे – पुणे जिल्ह्यात जमिन अकृषक दाखवण्यासाठी (नॉन अॅग्रीकल्चर) दाखवण्याच्या कामात अनेक बनावट आॅर्डर तसेच भोगवटा प्रमाणपत्राच्या आधारे ११२ दस्तांची नोंद केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबतची पडताळणी केल्यावर तब्बल ११० एनएच्या आर्डर या बनावट असल्याची धक्कादायक माहिती पुण्यात उघडकीस आली आहे. हा गंभीर प्रकार पुण्यातील हवेली ३ या दुय्यम निबंधक कार्यालयात घडला असून या बाबतचा अहवाल हा महसूल विभागाकडे सोपवण्यात आला आहे.Pune District १०१ forgery N A order documents order case opening
काही दिवसांपूर्वी तुकडेबंदी असतांनाही बोगस नोंदी केल्याची घटना महसूल विभागात उघडकीस आली होती. या नंतर अनेक बड्या अधिका-यांवर कारवाई करण्यात आली होती. यानंतर अनेक जमिनींची चुकीच्या पद्धतीने अकृषक म्हणून नोंदणी झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार हवेली ३ निबंधक कार्यालयातील १ हजार ४७२ दस्तांची तपासणी ही गेल्या पाच महिन्यांत करण्यात आली.
यात जवळपास ११२ दस्त हे बोगस भोगवटा प्रमाणपत्राच्या आधारे अकृषक दाखवल्याचे आढळले. या प्रकरणांची चौकशीची मागणी नोंदणी विभागाने केली होती. त्यानुसार तपसणीचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले होते. त्यानंतर अधिका-यांनी कसून तपासणी केली असता यातील तब्बल ११० दस्त हे चुकीच्या पद्धतीने अकृषक दाखवल्याचे समोर आले.
तसेच आएएस दर्जाच्या अधिका-याला प्रातांधिकारी दाखवून या नोंदी करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात मागणी दोन वर्षांपासून अनधिकृत कामांची दस्त नोंदणी ही बंद करण्यात आली आहे. विस्तारलेल्या पुण्याच्या उपनगरात दस्त नोंदणी रखडल्यामुळे अनेक सदनिकांची खरेदी विक्री झाली नाही. यामुळे बनावट कागत्रपत्रांच्या आधारे दस्त नोंदणीकरुन त्याचा विक्री करण्याचा प्रकार घडला आहे.