- पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत चंदननगर, वडु खुर्द आणि हडपसर येथे तीन वेगवेगळ्या विनयभंगाच्या घटना घडल्या असून चंदननगर आणि हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. Pune commisioner area three molestation cases registered in three police station
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत चंदननगर, वडु खुर्द आणि हडपसर येथे तिन वेगवेगळ्या विनयभंगाच्या घटना घडल्या असून चंदननगर आणि हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
वारंवार समज देऊनही अल्पवयीन मुलीचा पाठलका करणार्या अनिकेत प्रकाश डाडर (20, रा. यशवंतनगर, पुणे) याला चंदननगर पोलिसांनी अटक केली. याबाबत 14 वर्षीय पिडीतेनी याबाबत फिर्याद दिली आहे. हा प्रकार मागील सहा महिन्यापासून सुरू होता. तिचा विनयभंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या घटनेत तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी व मोबाईलमध्ये काढलेले फोटो पतीला दाखविण्याची धमकी दिल्याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज विष्णु पवार (25, रा. बार्शी, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 25 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे.
तिसर्या घटनेत 28 वर्षीय महिलेच्या ऑफीसमध्ये काम करणारा तरूण त्यांच्या घरी गेला. तेथे गेल्यानंतर महिलेनी त्याला इथे कशाला अशी विचारणा केली असता त्याने तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विशाल मिश्रा (30, खांदवेनगर, वाघोली) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका 28 वर्षीय महिलेनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार तुकाई दर्शन येथे घडला.
Pune commisioner area three molestation cases registered in three police station
महत्त्वाच्या बातम्या
- गतिमान नेतृत्वामुळेच भारताने केली कोविडच्या संकटावर मात, बांग्ला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक
- भाजप विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्यात ममताच योग्य, कॉँग्रेस आपसांत भांडून भाजपला वाढवतेय, रिपून बोरा यांचा घरचा आहेर
- दिल्ली हिंसाचाराचा सूत्रधार मोहम्मद अन्सार आपचा कार्यकर्ता, भाजपाचा आरोप
- अपयश झाकण्यासाठीच सत्ताधारी-विरोधकांची चिखलफेक, राजू शेट्टी म्हणतात तुमचा खेळ होतो, लोकांचा जीव जातो