राज्य सरकारने पेट्रोल – डिझेलवरील ‘व्हॅट ‘ कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदिश मुळीक यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -राज्य सरकारने आता पेट्रोल – डिझेलवरील ‘व्हॅट ‘ कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदिश मुळीक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. Pune BJP president Jagdish Mulik demanded state government reduce the petrol and diesel taxes
मुळीक यांनी सांगितले आहे की, महाविकास आघाडी सरकारने अलीकडेच सीएनजी वरील व्हॅट १० टक्क्यांनी कमी केला आहे. गेल्या अडीच वर्षांत या सरकारने प्रथमच कर कमी करून जनतेवरील भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी आहे. मूळ प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी आघाडी सरकारने अशा मलमपट्टीला प्राधान्य द्यावे हे दुर्दैवी आहे. गेली दीड वर्षे पेट्रोल , डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी करत आहे .
मात्र, या सरकारने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.
केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर २१ रोजी पेट्रोल – डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ५ व १० रुपयांची कपात केली. त्या पाठोपाठ भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्यांसह एकूण २५ राज्य सरकारांनी पेट्रोल डीझेल वरील मूल्यवर्धित करात कपात करून जनतेला दिलासा दिला. मात्र, महाराष्ट्राने पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट अजूनही कमी केलेला नाही. पेट्रोल , डिझेल जीएसटी च्या कक्षेत आणण्यासही महाराष्ट्राने विरोध केला आहे. आता तरी आघाडी सरकारने पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट कमी करावा आणि जनतेला दिलासा द्यावा असे मुळीक यांनी नमूद केले.
Pune BJP president Jagdish Mulik demanded state government reduce the petrol and diesel taxes
महत्त्वाच्या बातम्या
- पाच दिवसात काही जिल्ह्यात उष्णतेची लाट : ११ जिल्ह्यांना यल्लो अलर्ट जाहीर
- Sharad Pawar : आयुष्यभर आगीच लावल्या, शरद पवारांचे आडनाव बदलून आगलावे करा; सदाभाऊ खोत यांचे शरसंधान!!
- स्वप्नील जोशी-श्रेयस तळपदे ठरले मानधन वीर; एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात ?
- पहिल्या झटक्यात आश्वासन पूर्ती : गोव्यात डाॅ. प्रमोद सावंत सरकार देणार वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत!!