विशेष प्रतिनिधी
सांगली : सांगलीत एसटी संपाच्या १२ व्या दिवशी प्रवाशांच्या पाठिंब्यासाठी आंदोलक कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे एका दिवसात एक हजार प्रवाशांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे आता एसटी आंदोलनात अप्रत्यक्ष जनताही सहभागी होत आहे.
Public support for ST workers’ agitation, Signatures of thousands of citizens in Sangli day : ST staff Signature campaign
एसटीचे राज्य शासनात विलनिकरण व्हावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या पाठिंब्यावर कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या बाराव्या दिवशी सांगलीतील एसटी आंदोलकांनी प्रवासी आणि जनतेच्या पाठिंब्यासाठी सांगलीत सह्यांची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत एकाच दिवसात एक हजार प्रवासी नागरिकांनी सह्या करत एसटी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत संप लवकर मिटवला पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. सांगली जिल्ह्यातून जास्तीजास्त सह्यांचे निवेदन हे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना पाठवले जाणार आहे.।एसटी आंदोलनात सह्यांच्या रूपाने आता थेट जनताही उतरली असल्याने सरकारने आता याची दखल घ्यावी अशी मागणी पुढे येत आहे.
- एसटी कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी मोहीम
- आंदोलनाला जनतेचा मोठा पाठींबा
- दिवसात हजार जणांच्या स्वाक्षऱ्या
- सांगलीत स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.
- सह्यांचे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पाठवणार
- सह्यांच्या रूपाने आता थेट जनताही आंदोलनात
Public support for ST workers’ agitation, Signatures of thousands of citizens in Sangli day : ST staff Signature campaign
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी