मुख्यमंत्री सचिवालयातर्फे ‘पब्लिक ग्रीव्हन्सेस रिड्रसल सिस्टिम’ (PGRS) याबाबत सादरीकरण करण्यात आले
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दौऱ्यानिमित्त हैदराबाद हाऊस येथे मुख्यमंत्री सचिवालयातर्फे ‘पब्लिक ग्रीव्हन्सेस रिड्रसल सिस्टिम’ (PGRS) याबाबत सादरीकरण करण्यात आले. नागरिकांच्या अर्ज, निवेदने व तक्रारींवर तात्काळ आणि सकारात्मक कार्यवाही व्हावी, यासाठी ही ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. Public grievances
PGRS प्रणालीचे वैशिष्ट्ये:
1. नागरिकांकडून मुख्यमंत्री सचिवालयात प्राप्त होणाऱ्या अर्जांचे विभागनिहाय व तक्रारनिहाय वर्गीकरण होईल.
2. हे अर्ज स्कॅन करून संबंधित विभागांकडे कार्यवाहीसाठी पाठवले जातील.
3. अर्जाची सद्यस्थिती अर्जदाराला एसएमएसद्वारे कळवली जाईल.
4. अर्जावर कार्यवाही झाल्यावरही अर्जदारास एसएमएस पाठवून माहिती दिली जाईल.
5. यामुळे अर्जाचा कार्यवाहीचा ट्रॅक नागरिकांना पारदर्शकपणे कळेल.
मुख्यमंत्री यांनी या प्रणालीबाबत समाधान व्यक्त करत शासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेला त्वरित दिलासा देण्याचे धोरण अधिक प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले. या बैठकीस विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Public grievances will be redressed through a new system
महत्वाच्या बातम्या
- Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार
- Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या
- Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी
- UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही