• Download App
    २७ मार्चला रंगणार पं. भीमसेन जोशी स्मृती समारोह|Pt. Bhimsen Joshi Memorial Ceremony

    २७ मार्चला रंगणार पं. भीमसेन जोशी स्मृती समारोह

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : जीएसबी सभा मुलुंड या संस्थेतर्फे मुंबई फोरम ऑफ आर्टिस्टच्या सहकार्यानं २७ मार्चला पं. भीमसेन जोशी स्मृती समारोह आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ज्येष्ठ तबलावादक भरत कामत आणि हार्मोनियम वादक सुधीर नायक यांना यंदाचा पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार २०२२  प्रदान करण्यात येणार असून, त्यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांचे या महोत्सवात सादरीकरण होणार आहे. Pt. Bhimsen Joshi Memorial Ceremony

    जीएसबी सभा, मुलुंड या संस्थेतर्फे मुंबई फोरम ऑफ आर्टिस्ट यांच्या सहकार्याने दरवर्षी हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. येत्या रविवारी २७ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ तबलावादक भरत कामत आणि हार्मोनियम वादक सुधीर नायक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.



    ज्येष्ठ गायक पं. राम देशपांडे यांची संगीत मैफल होणार आहे. त्यांना सुधीर नायक हार्मोनियम साथ, भरत कामत तबला साथ, माधव पवार पखवाज साथ, रवींद्र शेणॉय मंजिरा साथ करणार आहेत. ज्येष्ठ सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ निवेदन करणार आहेत.

    या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गणेश हेगडे, प्रकाश गंगाधरे, प्रवीण कानविंदे, प्रवीण शिंपी, विनोद सौदागर उपस्थित राहणार आहेत.

    कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष बी.एस. बलिगा, उपाध्यक्ष सच्चीदानंद पडियार, सरचिटणीस गणेश राव, संयोजक के व्ही एन भट, यु. पद्मनाभ पै आदी मंडळींनी केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून याच्या प्रवेशिका महाराष्ट्र सेवा संघ हॉल, मुलुंड येथे सकाळी १०.३० ते संध्या.७ पर्यंत उपलब्ध आहेत.

    Pt. Bhimsen Joshi Memorial Ceremony

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    “पवार संस्कारित” काढताहेत एकमेकांचे जुने हिशेब; मधल्या मध्ये खराब होतीय फडणवीस सरकारची इमेज!!

    High Court : २००६ मुंबई लोकल बॉम्बस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल, ११ आरोपी निर्दोष मुक्त

    Sunil Tatkare : सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत प्रचंड गोंधळ; पत्ते उधळले, छावा संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी