• Download App
    कोव्हिशिल्ड लसीचा कच्चा माल तातडीने पुरवा , सीरमचे आदर पुनावाला यांची अमेरिकेकडे मागणी; राष्ट्रपती बायडन यांना ट्विटरद्वारे साकडे|Provide raw material for Covishield vaccine immediately,Respect for Serum Punawala's demand to US; Sakade to President Biden via Twitter

    कोव्हिशिल्ड लसीचा कच्चा माल तातडीने पुरवा , सीरमचे आदर पुनावाला यांची अमेरिकेकडे मागणी; राष्ट्रपती बायडन यांना ट्विटरद्वारे साकडे

    वृत्तसंस्था

    पुणे : भारतात कोरोनाविरोधी लसीचे उत्पादन वेगाने व्हावे, यासाठी अमेरिकेने लसीसाठी लागणाऱ्या कच्चा मालाची निर्यात तातडीने करावी, अशा आशयाची मागणी सीरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आदर पुनावाला यांनी केली आहे.Provide raw material for Covishield vaccine immediately,Respect for Serum Punawala’s demand to US; Sakade to President Biden via Twitter

    आदर पुनावाला यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांच्या कार्यालयीन वापरासाठी असलेल्या पोस्ट ट्विटरवर ट्विट करून ही मागणी केली आहे. कोरोनाविरोधात एकजुटीने लढा देण्याचा तुमचा खरा मानस असेल तर मी तुम्हाला लस निर्मात्या कंपन्यांच्या वतीने लासीसाठी लागणारा कच्चा माल कृपया पुरवावा, अशी विनंती करत आहे, असे पुनावाला यांनी म्हंटले आहे.



     

    भारतात सीरम इन्स्टिट्यूटने कोरोनाविरोधी कोव्हिशिल्ड लस तयार केली आहे. आतापर्यत देशात कोट्यवधी लोकांनी लसीचे डोस घेतले आहेत. अनेक देशात लसीच्या डोसची निर्यात भारताने केली. या लस निर्मितीसाठी लागणार कच्चा माल हा प्रामुख्याने अमेरिका आणि युरोपमधून येतो.

    परंतु तेथील सरकारनी या कच्चा मालाची निर्यात रोखून धरली आहे. त्यामुळे भारतात लसनिर्मितीवर परिणाम होण्यास सुरुवात झाली असून निर्मितीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. आता तर देशात अनेक ठिकाणी लसीची टंचाई जाणवू लागली आहे.

    या पार्श्वभूमीवर आदर पुनावाला यांनी लसीचा कच्चा माल तातडीने निर्यात करावा, असे साकडे अमेरिकेच्या राष्ट्रपतींना पोस्ट ट्विटरद्वारे घातले आहे. याबाबतची विस्तृत माहिती अमेरिकी प्रशासनाला काळविल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

    Provide raw material for Covishield vaccine immediately,Respect for Serum Punawala’s demand to US; Sakade to President Biden via Twitter

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस