• Download App
    पुण्यात देहविक्री करणा-या महिलांच्या खात्यामध्ये ७ कोटीचे अर्थसहाय्य जमा| prostitutes in Pune 7 crore financial assistance deposited in the account

    पुण्यात देहविक्री करणा-या महिलांच्या खात्यामध्ये ७ कोटीचे अर्थसहाय्य जमा

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : देहविक्री करणा-या महिलांच्या खात्यामध्ये  ७ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य जमा केले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती अश्विनी कांबळे यांनी दिली. prostitutes in Pune 7 crore financial assistance deposited in the account

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत सुटका केलेल्या पिडीतांना तसेच वेश्या व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणा-या महिलांना ही मदत दिली. पुणे जिल्हयातील बँक खाते असलेल्या 5 हजार 296 महिलांच्या बँक खात्यामध्ये ७ कोटी ९४ लाख ४० हजार रुपये दोन टप्प्यात भरले आहेत.



    वेश्या व्यवसायावर अवलंबून असणा-या महिलांना कोरडे अन्नधान्य व रोख आर्थिक सहाय्य या सारख्या मुलभूत सेवा ओळखपत्राची विचारणा न करता पुरविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २१ सप्टेंबर २०२० रोजी दिले होते.

    त्यानुसार जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती अश्विनी कांबळे यांचा समावेश आहे.

    निधीचे वाटप असे झाले

    •  पिडीता तसेच वेश्या व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणा-या महिलांना प्रतीमहा पाच हजार
    •  मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त
      २ हजार ५०० रुपये आर्थिक सहाय्य
    • पुणे जिल्हयासाठी ११ कोटी २६ लाख ६५ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जिल्हाधिकारी, पुणे यांच्या खात्यामध्ये ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२० साठी आला होता.
    •  पहिल्या टप्प्यात फेब्रुवारीमध्ये जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण विभाग, पुणे यांचेकडून ७ हजार ११ पैकी १ हजार ७६५ वेश्या व्यवसाय करणा-या महिलांच्या बँक खात्याचा तपशिलाप्रमाणे प्रती महिना ५ हजार प्रमाणे ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२० या तीन महिन्याचे रुपये १५ हजार प्रमाणे २ कोटी ६४ लाख ७५ हजार वितरीत केले आहेत.
    • दुस-या टप्प्यात ३ हजार ५३१ वेश्या व्यवसाय करणा-या महिलांच्या बँक खात्यात प्रती महिना ५ हजार प्रमाणे ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२० या तीन महिन्याचे रुपये १५ हजार प्रमाणे ५ कोटी २९ लाख ६५ हजार अर्थसहाय्य वितरीत केले.

    prostitutes in Pune 7 crore financial assistance deposited in the account

    Related posts

    CM Devendra Fadnavis : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

    महापौर कोण होणार हे राऊत नव्हे, मुंबईकरांनी ठरवले, नवनाथ बन म्हणाले,’देवा’भाऊ घरात बसणारे नाही काम करणारे मुख्यमंत्री

    Vanchit मुंबईत काँग्रेस आणि वंचित दोघेही अपयशी; तरी वंचितचा काँग्रेसला टोमणा!!