माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशी मी लग्न करणार आहे नाहीतर मी आत्महत्या करेल अशी भिती दाखवून एका तरुणाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशी मी लग्न करणार आहे नाहीतर मी आत्महत्या करेल अशी भिती दाखवून एका तरुणाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाेलीसांनी सुरज बबन कांबळे (वय-२२,रा.चंदगड, जि.काेल्हापूर) या आराेपी विराेधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.Promise marriage with १७ years girl and raped her by his friend, crime registered against him at hadapsar police station
याबाबत पिडित मुलीच्या आईने हडपसर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार या पुण्यातील मुंढवा परिसरात रहाण्यास असून त्यांच्या १७ वर्षीय मुलीस आराेपी सुरज कांबळे याने जानेवारी २०२२ मध्ये तिला मगरपट्टा येथील ओयाे टाऊन हाऊस याठिकाणी भेटण्यास बाेलवले.
त्याठिकाणी मुलगी गेली त्यावेळी तरुणाने तिच्याशी जवळीक साधत तिला आपण लवकर लग्न करु असे सांगितले. परंतु मुलीने त्याच्याशी जवळीक साधण्यास नकार दिला असता, मुलाने तिला मी मागील दाेन वर्षापासून तुझ्यावर प्रेम करत आहे. मी तुझ्याशीच लग्न करणार आहे
नाही तर मी आत्महत्या करेन अशी धमकी देऊन तिला भिती दाखवत तिच्या इच्छे विरुध्द जबरदस्तीने शारिरिक संबंध प्रस्थापित केले आहे. संबंधित गाेष्ट मुलीने तिच्या आईला सांगिल्यानंतर सदर प्रकरणी आराेपी विराेधात पाेलीसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Promise marriage with १७ years girl and raped her by his friend, crime registered against him at hadapsar police station
महत्त्वाच्या बातम्या
- सिल्वर ओक दगड – चप्पल फेक : पोलिसांवर ठपका ठेवून निलंबनाच्या कारवाईची शक्यता!!
- उत्तर प्रदेशात आता मदरशांमध्ये ड्रेस कोड आणि शिक्षणक्रमात मोठे बदल; योगी सरकारचा निर्णय!!
- Tukde Tukde Gang : श्रीनगरच्या जामा मशिदीत आजादीच्या घोषणा; 13 जणांना अटक!!
- आरोग्यविषयक चित्रपट नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज – पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर