वृत्तसंस्था
सोलन (हिमाचल प्रदेश) : केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका जाहीर करणार आहे. आजचा हा राजकीय मुहूर्त साधून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेत हिमाचल प्रदेश मध्ये टेम्पल रन सुरू केला आहे. प्रियंका गांधी यांनी आज सोलनमध्ये माँ शूलिनी मंदिरात जाऊन पूजाअर्चा केली. आज दुपारी त्या सोलन मध्येच परिवर्तन प्रतिज्ञा रॅलीमध्ये भाषण करणार आहेत. Priyanka Gandhi’s temple run started from the day the election was announced in Himachal
प्रियंका गांधींनी आपल्या हिमाचल दौऱ्याची सुरुवात माँ शूलिनी मंदिरापासून केल्याने त्यांच्या टेम्पल रनची चर्चा सुरू झाली आहे. 2019 च्या निवडणुकांपूर्वी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी देखील अशाच विविध मंदिरांमध्ये जाऊन दर्शने घेण्याचा सपाट आला होता. त्याला इंग्रजी माध्यमांनी टेम्पल रन असे नाव दिले होते. असाच टेम्पल रन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगाल मधल्या निवडणुकीपूर्वी केला होता. ज्या गावात त्या प्रचारासाठी जायच्या तेथे प्रचाराची सुरुवात त्या गावातल्या सुप्रसिद्ध मंदिरात जाऊन दर्शन घेऊन करायच्या.
भाजपने राजकीय हिंदुत्वाचा अजेंडा निवडणुकीत यशस्वी करून दाखवल्यानंतर सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना एक वेगळी राजकीय जाग आली आणि त्यांनी सॉफ्ट हिंदुत्वाची कास धरली. टेम्पल रन हा या सॉफ्ट हिंदुत्वाचाच राजकीय आविष्कार आहे. त्याची सुरुवात राहुल गांधींनी 2019 मध्ये केली. ममता बॅनर्जींनी तो प्रयोग पश्चिम बंगालमध्ये केला आणि आता प्रियांका गांधींनी आज हिमाचल प्रदेशातील माँ शूलिनी मंदिरापासून या टेम्पल रनची सुरुवात काँग्रेसच्या प्रचारासाठी केली आहे.
Priyanka Gandhi’s temple run started from the day the election was announced in Himachal
महत्वाच्या बातम्या
- राज्यात 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या : आस्तिककुमार पांडेय औरंगाबादचे जिल्हाधिकारी
- कर्नाटक हिजाब वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी : 10 दिवस युक्तिवाद ऐकल्यानंतर राखून ठेवला होता निकाल
- सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईत वाढ : भाजीपाला आणि डाळींच्या किमती वाढल्याने महागाई 7.41% वर पोहोचली, ऑगस्टमध्ये 7% होती
- UNGA मध्ये रशियाविरोधात निषेधाचा ठराव मंजूर : 143 देशांचा युक्रेनच्या 4 भागांवर रशियाच्या कब्जाला विरोध, भारत मतदानापासून दूर