उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये गेल्या 36 तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर कलम -144 चे उल्लंघन आणि शांतता भंग करण्याचे कलम लावण्यात आले आहे. त्यांना काही वेळात दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाऊ शकते. याआधी प्रियांका गांधींनी ट्विटरवर लखीमपूर हिंसाचाराशी संबंधित व्हिडिओ शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला होता. Priyanka Gandhi Arrested Sitapur Police arrested Priyanka Gandhi in the case of violation of Section 144 and breach of peace
वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये गेल्या 36 तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर कलम -144 चे उल्लंघन आणि शांतता भंग करण्याचे कलम लावण्यात आले आहे. त्यांना काही वेळात दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाऊ शकते. याआधी प्रियांका गांधींनी ट्विटरवर लखीमपूर हिंसाचाराशी संबंधित व्हिडिओ शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला होता. प्रियांका गांधींनी जाहीर केले होते की, पोलिस त्यांना हवे असल्यास अटक करू शकतात, पण त्या शेतकरी कुटुंबांना भेटल्याशिवाय परतणार नाहीत.
हरगाव पोलीस स्टेशनच्या एसएचओने सांगितले की, प्रियांका गांधींव्यतिरिक्त, खासदार दीपेंद्र सिंह हुडा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्यासह 11 जणांवर शांतता भंग करण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी प्रियांका गांधींनी ट्विटरद्वारे एक व्हिडिओ जारी केला होता आणि म्हटले होते – या व्हिडिओमध्ये तुमच्या सरकारच्या एका मंत्र्याचा मुलगा शेतकऱ्यांना कारखाली चिरडताना दिसत आहे. हा व्हिडिओ बघा आणि या देशाला सांगा की, या मंत्र्याला का काढून टाकण्यात आले नाही आणि या मुलाला अजून अटक का करण्यात आलेली नाही. तुम्ही माझ्यासारख्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना कोणत्याही आदेश आणि एफआयआरशिवाय कोठडीत ठेवले आहे. त्यांनी पुढे प्रश्न केला की, हा माणूस अजूनही मोकळा का फिरत आहे?
पीएम मोदींना लखीमपूरला बोलावले
व्हिडिओमध्ये प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या- ‘लखीमपूरला या आणि शेतकऱ्याची दुर्दशा समजून घ्या. त्यांचे संरक्षण करणे हा तुमचा धर्म आहे, हा संविधानाचा धर्म आहे ज्यावर तुम्ही शपथ घेतली आहे आणि त्याप्रति तुमचे कर्तव्य आहे. जय हिंद… जय किसान. याआधी, प्रियांका गांधींना सीतापूरमध्ये गेल्या 36 तास नजरकैदेत ठेवण्यात आले होते. लखीमपूर हिंसाचारानंतर मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्या जात होत्या. प्रियांका यांना सीतापूरच्या पीएसी कॅम्पसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. काँग्रेस कार्यकर्तेही छावणीबाहेर धरणे देत आहेत. प्रियांका गांधीही अटकेपासून उपोषण करत आहेत.
प्रियांका हार मानणार नाहीत : राहुल गांधी
प्रियांका गांधींच्या अटकेबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, ज्यांना कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्या घाबरत नाही – त्या खऱ्या काँग्रेसी आहेत, हार मानणार नाही! सत्याग्रह थांबणार नाही. #FarmersProtest
Priyanka Gandhi Arrested Sitapur Police arrested Priyanka Gandhi in the case of violation of Section 144 and breach of peace
महत्त्वाच्या बातम्या
- प्रियांका गांधी केंद्रस्थानी येत असल्याने अखिलेश यादव अस्वस्थ; निघाले उत्तरप्रदेशच्या रथयात्रेवर!!
- ‘तुम्ही शांततेची चर्चा करता, तिकडे तुमचे पंतप्रधान ओसामाला शहीद म्हणतात’ भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानला फटकारले ।
- लखीमपूर खीरी : वरुण गांधींचे मुख्यमंत्री योगींना पत्र, सीबीआय चौकशी आणि पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटीची भरपाई देण्याची मागणी
- राज्यसभेतील फक्त एका खासदाराची गेल्या सात सत्रांमध्ये 100% उपस्थिती, जाणून घ्या कोण आहेत हे नेते?
- BIG NEWS AURANGABAD : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी नमामि गंगे योजनेत औरंगाबादचा समावेश! खाम नदीला मिळणार नवसंजीवनी