• Download App
    Prithviraj Chavan Operation Sindhur Video Viral Pakistan Media BJP Criticism Photos Videos Report पृथ्वीराज चव्हाणांचा व्हिडिओ पाकिस्तानात व्हायरल; भारताच्या पराभवाचा केला होता दावा; भाजपने म्हटले- काँग्रेसच्या तोंडी पाकचीच भाषा

    Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाणांचा व्हिडिओ पाकिस्तानात व्हायरल; भारताच्या पराभवाचा केला होता दावा; भाजपने म्हटले- काँग्रेसच्या तोंडी पाकचीच भाषा

    Prithviraj Chavan

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Prithviraj Chavan ऑपरेशन सिंदूरमध्ये पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाल्याचा दावा करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांचा व्हिडिओ पाकिस्तानी माध्यमांनी उचलून धरला आहे. त्यात चव्हाणांच्या दाव्याची री ओढत पाकने भारताला अर्ध्या तासातच पाणी पाजल्याचा दावा केला जात आहे. भाजपने पाक माध्यमांचा हा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते बोलतात पाकिस्तानची भाषा आणि काँग्रेसला पाकच्या मदतीची आशा, असे भाजपने म्हटले आहे.Prithviraj Chavan

    पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकताच पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यात त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकने भारताचा पराभव केल्याचा धक्कादायक दावा केला होता. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले होते. पण या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 7 मे रोजी अर्ध्या तासातच आपली काही विमाने पाडण्यात आली, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे राज्यासह देशात एकच खळबळ माजली होती. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत होत्या. विशेषतः भाजप नेत्यांनी त्यांच्या माफीची मागणी केली होती. पण त्यांनी माफी मागण्यास साफ नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी माध्यमांत त्यांच्या या दाव्याची चर्चा सुरू झाली आहे.Prithviraj Chavan



    काय म्हणाले भाजप प्रवक्ते?

    भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या प्रकरणी चव्हाणांच्या विधानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात एक पाकिस्तानी वृत्तवाहिनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा दाखला देत पाकने भारताला अर्ध्या तासाच्या लढाईतच पाणी पाजल्याचा दावा करताना दिसून येत आहे. उपाध्ये यांनी या व्हिडिओवर तीव्र संताप व्यक्त करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, काँग्रेस नेते बोलतात पाकिस्तानचीच भाषा, पाकिस्तानच्या मदतीची कॉंग्रेस नेत्यांना आशा. मणिशंकर अय्यर, राहुल गांधी यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत
    पाकिस्तानला दिलासा देणारी विधाने हीच काँग्रेसची ओळख बनली आहे.

    ताजं आणि धक्कादायक उदाहरण: पृथ्वीराज चव्हाण यांचं. “भारत OperationSindoor पहिल्या दिवशी हरला” हे वक्तव्य पाकिस्तानच्या मीडियात साजरं केलं जात आहे. सोबतची व्हीडीओ क्लीप पाहा. वास्ताविकतः भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी OperationSindoor मध्ये पाकिस्तानला झालेल्या नुकसानाचा तपशील सांगितला आहे. त्यांच्या मते, भारताच्या हल्ल्यात पाकचे एकूण 4 ठिकाणचे रडार नष्ट झाले, 2 कमांड आणि कंट्रोल सेंटर्स, 2 हवाई तळांवरील धावपट्ट्या, तीन वेगवेगळ्या स्टेशन्सवरील 3 हॅन्गर्सचे नुकसान, एक C-130 क्लासचे विमान नष्ट, 4-5 लढाऊ विमाने, बहुधा F-16 विमानांचे नुकसान, एक लांब पल्ल्याचे विमान (AEW&C किंवा SIGINT) 300 किमी पलीकडील हल्ल्यात नष्ट, 5 अत्याधुनिक लढाऊ विमाने (F-16 किंवा JF-17 क्लास) नष्ट, 1 सरफेस टू एअर मिसाईल (SAM) प्रणाली नष्ट झाली.

    पण भारत जिंकत असताना, कॉंग्रेसला पराभवच का दिसतो? कारण त्यांचा विश्वास ️भारतीय सैन्यावर नाही, भारतीय अधिकाऱ्यांवर नाही, सत्यावर नाही. त्यांचा विश्वास आहे, पाकिस्तानच्या कथनावर. देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांपेक्षा शत्रूच्या प्रचाराला जास्त वजन देणं हे फक्त राजकारण नाही, ही धोकादायक मानसिकता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

    आत्ता पाहू काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

    पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले होते. पण या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 7 मे रोजी अर्ध्या तासातच आपली काही विमाने पाडण्यात आली. हे लोकांनी मान्य करो किंवा न करो, पण हेच सत्य आहे. पाकने भारताचा पाडाव केला हेच खरे आहे. पहिल्या दिवशी भारताची विमाने पाडल्यानंतर भारतातील लष्कराची सर्व विमाने उतरवण्यात आली. त्या दिवशी कुठेही विमाने उडली नाही. ग्वाल्हेर, भटिंडा असेल किंवा सरसा येथील हवाई तळावरूनही एकही विमान झेपावले नाही.

    ते असेही म्हणाले होते की, यापुढच्या काळात युद्ध हे हवाई युद्ध होणार आहेत. अशावेळी इतक्या मोठ्या सैन्य दलाचा उपयोग होणार नाही. नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पाहिले की, लष्कराची एक किलोमीटरचीही हालचाल झाली नाही. दोन ते तीन दिवस चाललेल्या या युद्धात केवळ हवाई हल्ले आणि क्षेपणास्त्र डागण्यात आली. भविष्यातही अशाच प्रकारे युद्ध लढली जातील. अशावेळी 12 लाखांचे सैन्य दल आपण बाळगावे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये काय झाले? याची चौकशी केली जावी. तसेच ऑपरेशन सिंदूरची खरी माहिती बाहेर यावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.

    Prithviraj Chavan Operation Sindhur Video Viral Pakistan Media BJP Criticism Photos Videos Report

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर, भारतीय लेकींनी कोरले क्रिकेट विश्वचषकावर नाव; मुख्यमंत्री फडणवीसांकडून सत्कार

    Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणातून उज्ज्वल निकम यांना हटवण्याची मागणी; सुदर्शन घुले सुनावणीदरम्यान चक्कर येऊन पडला

    Hasan Mushrif : सतेज पाटील आणि आमच्यातील दोरी तुटली; कॉंग्रेसवर त्यांच्याच लोकांचा विश्वास नाही, हसन मुश्रीफ यांचा खोचक टोला