विशेष प्रतिनिधी
मुंबई : Prithviraj Chavan महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या मुद्यावरून चांगलेच राजकारण पेटले आहे. महायुती सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मोर्चा देखील काढणार आहेत. या मुद्द्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील यावर आपले मत व्यक्त केले आहे. मराठी अन्याय होता कामा नये ही आमची भावना आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.Prithviraj Chavan
मराठीवर अन्याय होता कामा नये ही आमची भावना
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावे ही राज ठाकरे यांची पॉलिटिकल ॲक्शन आहे. कसा मोर्चा काढायचा हा त्यांचा भाग आहे. या मोर्चात सहभागी व्हायचे की नाही हे प्रदेशाध्यक्ष व नेते ठरवतील. पण मराठीवर अन्याय होता कामा नये ही आमची भावना आहे. ती कशाप्रकारे मांडायचे हे आम्ही ठरवू. मोर्चामुळे ते (राज आणि उद्धव) एकत्र येत आहेत असे काही नाही. ही चर्चा गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर त्यांची ही चर्चा सुरू आहे. दोघांची संख्या वाढेल या दृष्टीने त्यांची चर्चा आहे.
पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, घरातील वाद, भांडण मिटत असतील तर ही आनंदाची बाब आहे, पण आमची महाविकास आघाडी आहे त्याचे घटक पक्ष उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी कोणाबरोबर युती करावी हा त्यांचा भाग आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
सरकारने शिक्षणावरचा खर्च कमी केला
केंद्र आणि राज्य सरकारने शिक्षणावरचा खर्च कमी केला आहे हा मूलभूत मुद्दा आहे. आपण किती भाषा ठेवा पण शिकवायला मूलभूत सामग्री नाही. शिक्षणाची दुर्दशा झाली आहे आणि दुसऱ्या बाजूला भाषेचा मुद्दा काढत आहेत, अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. प्राथमिक शिक्षण असो माध्यमिक शिक्षण असो किंवा उच्च शिक्षण असेल त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची गरज असून बाकीचे सर्व निरर्थक वाद आहेत.
स्थानिक भाषांचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न
पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हिंदी ही राजभाषा आहे. देशाला लिंक लँग्वेज म्हणून हिंदी भाषेचा वापर होतो. इंग्रजी ही ज्ञान भाषा आहे. इंग्रजीमध्ये जेवढे नवीन संशोधन होत आहे ते इतर कोणत्याही भाषेत होत नाही. राज्यकर्त्यांचा जो प्रयत्न सुरू आहे इंग्रजीला बाजूला करा आणि स्थानिक भाषांचे महत्त्व कमी करा. यासाठी एक एक प्रयत्न चालवले असल्याने हा गदारोळ उठला आहे. विद्यमान शासन मराठीला विरोध करू शकणार नाही, पण ज्या प्रकारे नवीन शैक्षणिक धोरण राबवले जात आहे त्यामुळे गदारोळ उठला आहे.
राज्यकर्त्यांना एकच भाषा ठेवायची आहे ती म्हणजे हिंदी. हे मुळात चुकीचे धोरण आहे. तीन भाषेचा धोरण आपण पूर्वीपासून स्वीकारले आहे, त्यामुळे हिंदी सक्ती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे शिक्षक नाहीत, पुस्तके नाहीत असे असताना भाषा वाढवण्याचा आग्रह धरला जात असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
Prithviraj Chavan: Marathi Must Not Suffer Injustice
महत्वाच्या बातम्या
- Punjab Gangster : पंजाबमध्ये गँगवार! गोळीबारात गँगस्टर जग्गूच्या आईसह ASIच्या मुलाचा मृत्यू
- Tej Pratap Yadav : लालू पुत्र तेजप्रताप यादव यांनी आता स्वतःला म्हटलं ‘किंगमेकर’
- ठाकरे बंधूंच्या ऐक्यावर पवारांच्या पक्षात आनंदाच्या उकळ्या; पण पवारांचा विचार चालू यातून भाजायच्या कशा राजकीय पोळ्या??
- हिंदी सक्तीचा निर्णय घेऊन उद्धव ठाकरे नामानिराळे; अजितदादाही फडणवीस सरकारविरुद्ध फिरले; narrative setting मध्ये भाजपचे नेते उणे पडले!!