वृत्तसंस्था
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी 4:30 वाजता येथील नागपूर मार्गावरील डोर्ली शिवारात महिला बचत गटांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात वर्धा-कळंब या 39 किमी ब्रॉडगेज रेल्वे लाइनसह प्रवासी रेल्वेचा शुभारंंभ होणार आहे. यासोबतच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीचा 16 वा हप्ता वितरित केला जाणार आहे.Prime Minister Narendra Modi will arrive in Yavatmal today; Distribution of PM Kisan and Namo Shetkari Mahasanman Fund will be done along with various schemes
या प्रकल्पांचे होणार लोकार्पण
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वर्धा-कळंब या नव्याने साकारलेल्या 39 किलोमीटरच्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गासह प्रवासी रेल्वेचा शुभारंभ होईल. अमळनेर-आष्टी ब्रॉडगेज रेल्वे लाइन (32 किमी) व प्रवासी रेल्वेचा शुभारंभ, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तथा बळीराजा जलसंजीवनी योजना या अंतर्गत विदर्भ व मराठवाडा क्षेत्राकरिता सिंचन योजनांचे लोकार्पण होईल, तसेच वरोरा-वणी राष्ट्रीय महामार्ग क्र. 930 चे चौपदरीकरण, साकोली-भंडारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 सी प्रकल्प आणि सालई खुर्द-तिरोरा महामार्ग क्र. 753 प्रकल्पाचे लोकार्पण होईल.
यवतमाळ शहरात पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. याचे अनावरणही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत एक कोटी नागरिकांना आयुष्मान कार्ड वितरणाचा शुभारंभ होईल. पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे राज्यातील सुमारे ८८ लाख पात्र शेतकरी कुटुंबांना वितरण होईल.
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, संजय राठोड, धनंजय मुंडे, अतुल सावे, अतुल सावे, हंसराज अहिर, खासदार भावना गवळी व खासदार हेमंत पाटील हे मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
Prime Minister Narendra Modi will arrive in Yavatmal today; Distribution of PM Kisan and Namo Shetkari Mahasanman Fund will be done along with various schemes
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत कुर्ला येथे प्रकल्पबाधितांना 961 घरांचे मुखमंत्र्यांच्या हस्ते वाटप!!
- CAA मार्चमध्ये लागू होणार? ; लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा घेणार निर्णय!
- EDने केजरीवालांना पाठवले आठवे समन्स, ‘या’ दिवशी चौकशीसाठी बोलावले
- शिवराळ भाषा जरांगेंची, पण पवारांचा फडणवीसांवरच असभ्यतेचा आरोप; अप्रत्यक्षपणे घेतली जरांगेंची बाजू!