पुरस्काराची रक्कम त देत असल्याचे मोदींनी केले जाहीर
विशेष प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४१ व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले आहे. पुण्यातील सरपरशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्यपाल बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक आदींची मंचावर उपस्थिती होती. Prime Minister Narendra Modi honored with Lokamanya Tilak National Award
या पुरस्कार सोहळ्यासाठी लोकमान्य टिळक वापरायचे तसंच खास उपरणं मोदी यांना देण्यात आलं. लोकमान्य टिळक यांच्या ओळख असलेली पुणेरी पगडी यावेळी पंतप्रधानांना घालण्यात आली. पुरस्काराचं सन्मानपत्र, ट्रॉफी देण्यात आली. या ट्रॉफीत भगवत गीता, लोकमान्यांची पगडी, केसरी वृत्तपत्राचा पहिला अंक आणि लोकमान्यांची प्रतिमा आहे.
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पुणेकर आणि महाराष्ट्राचे आभार मानले आणि भाषणातून भावना व्यक्त केल्या, मोदी म्हणाले, “आपल्या देशात काशी आणि पुण्याला विशेष ओळख आहे. पुणे आणि काशीत विद्वत्ता चिरंजीव आहे. येथे विद्वत्तेला अमरत्व प्राप्त झाले आहे. पुणे नगरी विद्वत्तेची दुसरी ओळख आहे. अशा भूमित सन्मानित होणं यापेक्षा गर्वाची दुसरी गोष्ट नाही. कोणताही पुरस्कार मिळतो तेव्हा आपली जबाबदारीही वाढते. या पुरस्कारासाठी टिळकांचं नाव जोडलं असेल तर दायित्व कित्येक पटीने वाढतं. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मी देशातील १४० देशवासियांच्या चरणी समर्पित करतो.
याचबरोबर, “ज्यांच्या नावात गंगाधर आहे त्यांच्या नावाने मिळणाऱ्या या पुरस्कारासह मिळणारी रक्कम मी गंगेला समर्पित करत आहे. मी पुरस्काराची रक्कम नमामी गंगे परियोजनासाठी दान देण्याचा निर्णय घेतला आहे. असे जाहीर करून, मी देशवासियांना विश्वास देतो की त्यांच्या सेवेत त्यांची आशा, अपेक्षांच्या पूर्तीसाठी कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही, असं आश्वासनही मोदींनी दिलं.
Prime Minister Narendra Modi honored with Lokamanya Tilak National Award
महत्वाच्या बातम्या
- समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना! शहापूर येथे गर्डरसह क्रेन कोसळल्याने १५ कामगारांचा मृत्यू
- Lok Sabha Elections 2024 : पंतप्रधान मोदींनी ‘NDA’ खासदारांना लोकसभा निवडणुकीसाठी दिला कानमंत्र!
- 2015 मधले भाकीत 2023 मध्ये ठरले खरे; देशातले सर्वांत मोठे राजकीय हवामान तज्ञ आज मोदींबरोबर व्यासपीठावर!!
- Land For Job Scam प्रकरणात ‘ED’चा लालूंना दणका, सहा कोटींची मालमत्ता जप्त!