राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी हे अधिवेशन विविध मुद्द्यांमुळे चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्तधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. यावर भाजपच्या सदस्यांनी आक्षेप घेत भास्कर जाधवांनी पीएम मोदींचा अवमान केल्यामुळे त्यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला. Prime Minister Modi’s mimicry in the House by Bhaskar Jadhav, Devendra Fadnavis demanded suspension
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी हे अधिवेशन विविध मुद्द्यांमुळे चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्तधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. यावर भाजपच्या सदस्यांनी आक्षेप घेत भास्कर जाधवांनी पीएम मोदींचा अवमान केल्यामुळे त्यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला.
पंतप्रधानांविषयी अशाप्रकारे अंगविक्षेप करून बोलताना शरम वाटायला हवी, असेही फडणवीसांनी सुनावले. भास्कर जाधव यांनी माफी मागितलीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
काय घडले सभागृहात ?
सभागृहात ऊर्जामंत्री नितीन राऊत हे एका प्रश्नावर उत्तर देत असताना या सगळ्या वादाची सुरुवात झाली. चर्चा सुरू असताना नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या १५ लाखांच्या आश्वासनाचा मुद्दा उपस्थित झाला. यावेळी करोनामुळे आपल्याला १०० युनिट वीज मोफत देण्याच्या आश्वासनाची पूर्ती करता आली नाही, असे ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं. पीएम नरेंद्र मोदी यांनीही प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये देण्याच्या आश्वासनाचा उल्लेख केला. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी कधीच असे बोलले नाही, असा दावा केला. त्यावर भास्कर जाधव यांनी जागेवर उभे राहत नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करत वाक्य बोलून दाखवले. हे पाहून देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला. सभागृहात देशाच्या पंतप्रधानांची नक्कल करणे हे योग्य नाही. सभागृहात अशाप्रकारचा पायंडा पडता कामा नये, असे फडणवीसांनी सुनावले.
एवढे होऊनही भास्कर जाधव काही केल्या ऐकायला तयार नव्हते. नरेंद्र मोदी यांनी ते वक्तव्य पंतप्रधान होण्यापूर्वी केले होते. त्यामुळे मी पंतप्रधान नव्हे तर भाजपच्या उमेदवाराची नक्कल केली, असा अर्थ होऊ शकतो. यानंतरही भाजपच्या आमदारांनी सभागृहाचे कामकाज चालू दिले नाही. त्यावर भास्कर जाधव यांनी मी माझे शब्द आणि अंगविक्षेप मागे घेतो, असे म्हटले. मात्र, अंगविक्षेप मागे घेण्याचे कोणतेही आयुध उपलब्ध नाही. भास्कर जाधव अजूनही हा विषय थट्टेने घेत आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी आपल्या अधिकारांचा वापर करून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. पंतप्रधानांचा असा अवमान होणार असेल तर हक्कभंग आणला जाईल. त्यांनी अंगविक्षेप केल्याचं मान्य केलं आहे, त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. यावर मी माफी मागू शकत नाही, मी शब्द मागे घेतले आहेत, असे भास्कर जाधव म्हणाले. परंतु, त्यानंतरही सभागृहात गदारोळ सुरूच राहिल्याने विधानसभा अध्यक्षांनी कामकाज तहकूब केलं.
Prime Minister Modi’s mimicry in the House by Bhaskar Jadhav, Devendra Fadnavis demanded suspension
महत्त्वाच्या बातम्या
- बीज बँक प्रत्येक गावागावात साकारा; बीज माता राहीबाई पोपरे यांचे आवाहन
- एसटी स्टॅण्डवर गाणं गाऊन हकायच्या कुटुंबाचा गाडा ; महेश टिळेकर यांनी पैठणी आणि आर्थिक मदत देऊन केला सन्मान
- हिंदू देवदेवतांविषयी केलेल्या विधानाबाबत जितनराम मांझी यांनी मागितली माफी
- तृणमूल कॉँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन निलंबित, सभापतींच्या दिशेने भिकावले नियमांचे पुस्तक
- उध्दव ठाकरे यांचे खास रवींद्र वायकर यांची ईडीकडून आठ तास चौकशी