• Download App
    नौदलातील सर्व नामाभिधाने यापुढे भारतीयच; नौदलाचे जन्मस्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्गातून पंतप्रधान मोदींची घोषणा!! Prime Minister Modi's announcement from Chhatrapati Shivaji Maharaj's Sindhudurga, the birthplace of the Navy

    नौदलातील सर्व नामाभिधाने यापुढे भारतीयच; नौदलाचे जन्मस्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्गातून पंतप्रधान मोदींची घोषणा!!

    विशेष प्रतिनिधी

    सिंधुदुर्ग : भारताचा नौदल दिन प्रथमच भारतीय नौदलाचे जन्मस्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर मावळत्या दिनकराच्या साक्षीने साजरा झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय नौदलातील अधिकाऱ्यांची सर्व नामाभिधाने यापुढे भारतीयच असतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली, इतकेच नाहीतर इथून पुढे आर्मी डे, नेव्ही डे आणि एअर फोर्स डे अर्थात भारतीय सशस्त्र सैन्य दिन, नौदल दिन आणि हवाईदल दिन हे दिवस राजधानी दिल्लीत नव्हे, तर देशातल्या वेगवेगळ्या सशस्त्र दलांच्या केंद्रांवर साजरे होतील, असेही जाहीर केले. Prime Minister Modi’s announcement from Chhatrapati Shivaji Maharaj’s Sindhudurga, the birthplace of the Navy

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्रथमच नौदल दिन साजरा होत असताना पंतप्रधानांचे भाषण देखील अनोखे ठरते. त्यांनी त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

    याचा संदर्भ देऊन पंतप्रधान म्हणाले :

    देशातून गुलामीच्या मानसिकतेची सर्व चिन्हे काढून टाकण्याची आमच्या सरकारची भूमिका आहे. त्या भूमिकेतूनच गेल्या वर्षी नौदलाचा ध्वज आणि त्याचे मानचिन्ह बदलण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या नौदलाच्या प्रेरणेतून नवे मानचिन्ह स्वीकारले.

    यापुढे भारतीय नौदल अधिकारी परिधान करणाऱ्या विविध नामाभिधानांची नावे देखील भारतीय असतील ही प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

    भारताचा इतिहास हा केवळ 1000 वर्षांच्या गुलामीचा इतिहास नाही. तो कला – संस्कृती आणि देश निर्माणचा देखील इतिहास आहे. भारताला फार मोठी ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. वेगवेगळ्या साम्राज्यांनी नौदलाचे महत्त्व ओळखून त्या काळात आपापले नौदल विकसित केले होते.

    चोल साम्राज्याने आपल्या नौदलामार्फत पूर्व आशियातील देशांची व्यापार वाढविला होता, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाने पश्चिम आशियाशी आपला संपर्क प्रस्थापित केला होता. एकेकाळी सुरतच्या बंदरावर 80 देशांच्या नौका नांगर टाकून उभ्या असत.

    “ज्याच्या जलावर अधिकार, तो सर्वशक्तिमान”, हे वचन ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाची निर्मिती केली. त्यातून मराठा साम्राज्यासाठी फार मोठे संरक्षक कवच निर्माण केले.

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या या प्रेरणेतूनच भारतीय नौदलाने “मेक इन इंडिया” सारख्या उपक्रमाला आत्मसात करत वेगवेगळ्या प्रकारची सामग्री निर्मिती आणि वापर वाढविला आहे. ही भारताची संरक्षण सिद्धता आणखी मजबूत करून देशवासीयांच्या सेवेत अत्याधुनिक नौदल कार्यरत राहणार आहेत.

    इथून पुढचे भारतीय सशस्त्र दलांचे दिवस वेगवेगळ्या केंद्रांवर होणार असल्याने त्यांच्याविषयी देशवासीयांच्या मनात आकर्षण वाढेल. त्यातून इथले पर्यटन वाढेल. रोजगाराला प्रोत्साहन मिळेल आणि देशात एक नवे चैतन्य निर्माण होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

    या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार, नौदल प्रमुख आर. हरिकुमार उपस्थित होते.

    Prime Minister Modi’s announcement from Chhatrapati Shivaji Maharaj’s Sindhudurga, the birthplace of the Navy

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!