• Download App
    पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण Prime Minister Modi unveils statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Pune Municipal Corporation

    पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण

    प्रतिनिधी

    पुणे : पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोशीयारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, छत्रपती उदयनराजे भोसले, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.Prime Minister Modi unveils statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Pune Municipal Corporation

    यावेळी पंतप्रधानांनी आधी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. मोदींच्या समवेत यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते. पुतळ्याच्या अनावरणानंतर पंतप्रधान मोदींचा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, पंतप्रधानांसाठी बनवलेला खास फेटा आणि उपकरणे भेट देऊन विशेष सत्कार केला. या नंतर पंतप्रधानांनी तिथे उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने भाजपाचे नगरसेवक होते.

    या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. परंतु ते प्रामुख्याने मागेच राहिलेले दिसले.

    Prime Minister Modi unveils statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Pune Municipal Corporation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lohagad Murder Case : सियाने केतनचा खून करण्यासाठी केली राजा रघुवंशी प्रकरणाची स्टडी; सर्च हिस्ट्रीतून रहस्य उघड; हेही विचारले- पोलिस कोठडीत महिलेला मारहाण होते का?

    Ashadhi Wari 2026 : वारीत अत्यावश्यक रुग्णांकरिता प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची माहिती

    Raigad Waterfall Rescue : रायगडमध्ये धबधब्यावर अडकलेल्या 100 पर्यटकांची सुटका:वसईत 20 गाड्या बुडाल्या; मानखुर्दमध्ये चाळ कोसळून 6 जणांचा मृत्यू