प्रतिनिधी
पुणे : पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोशीयारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, छत्रपती उदयनराजे भोसले, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.Prime Minister Modi unveils statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Pune Municipal Corporation
यावेळी पंतप्रधानांनी आधी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. मोदींच्या समवेत यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते. पुतळ्याच्या अनावरणानंतर पंतप्रधान मोदींचा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, पंतप्रधानांसाठी बनवलेला खास फेटा आणि उपकरणे भेट देऊन विशेष सत्कार केला. या नंतर पंतप्रधानांनी तिथे उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने भाजपाचे नगरसेवक होते.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. परंतु ते प्रामुख्याने मागेच राहिलेले दिसले.