मराठवाडा आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट, तर मुंबई आणि पुण्यातही पुढील ४८ तासांत अवकाळी पावसाचा अंदाज
विशेष प्रतिनिधी
राज्यभरात ठिकठिकाणी आज पावसाने हजेरी लावली. यामध्ये प्रामुख्याने सातारा, पाचगणी, महाबळेश्वर येथे सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. तळकोकणातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. आंबोली, सिंधुदुर्ग, चौकुळ, गेळे परिसरात मुसळधार अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू आणि द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. Presence of unseasonal rain at various places in the state
हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट दिला असून मुंबई आणि पुण्यातही पुढील ४८ तासांत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, सातारा जिल्ह्यातही पुढील तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सातारा महाबळेश्वर, पाचगणी वाई भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरी पिकाला मात्र मोठा फटका बसणार आहे. या पावसाने शेतात काढणीला आलेला भुईमूग उन्हाळी ज्वारी, गहू पिके तसेच आंब्याच्या भागातील लगडलेल्या कैऱ्यांवर या पावसाचा मोठा परिणाम होऊन जोराच्या वाऱ्यामुळे अनेक आंबा उत्पादकांना हा पाऊस नकोसा ठरला .
मध्य प्रदेशपासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यभरात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. शुक्रवारी उकाडा जाणवत असताना दुपारपासून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला.
Presence of unseasonal rain at various places in the state
महत्वाच्या बातम्या
- Indian Space Policy 2023 : मोदी सरकारची ‘भारतीय अंतराळ धोरण 2023’ला मंजुरी
- COVID19 : महाराष्ट्रात मागील २४ तासांत ८०० पेक्षा अधिक नवीन करोनाबाधित, तीन रुग्णांचा मृत्यू
- Aadhar-PAN : ‘या’ तारखेपर्यंत जर पॅनकार्ड आधार कार्डशी जोडले नाही, तर तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय होणार!
- केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित घरगुती गॅस किंमत मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी – अनुराग ठाकूर