• Download App
    भाजपने मला १०० कोटींची ऑफर दिलेली , शशिकांत शिंदेंच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकर यांनी दिली ' ही ' प्रतिक्रिया | The Focus India

    भाजपने मला १०० कोटींची ऑफर दिलेली , शशिकांत शिंदेंच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकर यांनी दिली ‘ ही ‘ प्रतिक्रिया

    मी कधीच शरद पवारांची साथ सोडणार नाही अस मत मांडत शशिकांत शिंदे यांनी मी राष्ट्रवादी सोबत कायम असल्याचं सांगितलं आहेPraveen Darekar responds ‘yes’ to Shashikant Shinde’s statement that BJP offered me Rs 100 crore


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भाजपने आपल्याला पुन्हा एकदा ऑफर दिल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात केला आहे. भारतीय जनता पक्षात यावं यासाठी भाजपने आपल्याला तेव्हा १०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असं वक्तव्य पुन्हा एकदा शशिकांत शिंदे यांनी केलं आहे.

    काही महिन्यांपूर्वी देखील शशिकांत शिंदे यांनी हा दावा केला होता. त्यानंतर आता पुन्हा हा दावा केल्याने भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.



    शशिकांत शिंदेला १०० कोटींची ॲाफर भाजप देईल असे मला वाटत नाही. चर्चेत राहाण्यासाठी हे त्यांचे स्टंट आहे अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली आहे. आणि हा दावा मोडीत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

    काय म्हणाले होते शशिकांत शिंदे

    मेलो तरी शरद पवार यांना मी सोडणार नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मला १०० कोटींची ऑफर दिलेली. पण मी ही ऑफर धुडकावून लावली होती. मी कधीच शरद पवारांची साथ सोडणार नाही अस मत मांडत त्यांनी मी राष्ट्रवादी सोबत कायम असल्याचं सांगितलं आहे.

    Praveen Darekar responds ‘yes’ to Shashikant Shinde’s statement that BJP offered me Rs 100 crore

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!